scorecardresearch

मुंबई : नेहरू नगर इमारत दुर्घटनाप्रकरणी गुन्हा दाखल; एकाला अटक

घर मालकासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

man arrest
प्रतिनिधिक छायाचित्र

कुर्ल्यातील इमारत दुर्घटनाप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली. पोलिसांनी स्वतः याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दिलीप कृष्णा विश्वास असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम ३०४ (२), ३०८, ३३८, ३३७ आणि ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विश्वाससह घरमालक रजनी राठोड, किशोर चव्हाण, बाळकृष्ण राठोड व इतर अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शरद पाठक यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१९ कामगारांचा मृत्यू झाला असून इतर १३ कामगार जखमी –

इमारत धोकादायक असल्यामुळे ती पडू शकते याची कल्पाना असतानाही जाणूनबुजून घर मालकासह दिलीप कृष्ण विश्वास यांनी घरे भाड्याने राहण्यासाठी दिली होती. इमारतीत जवळपास ३७ कामगारांना राहण्यासाठी घरे देण्यात आली होती. या घटनेत १९ कामगारांचा मृत्यू झाला असून इतर १३ कामगार जखमी झाले आहेत. जखमींवर शीव आणि राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दल आणि एनडीआरएफने शर्थीचे प्रयत्न करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai crime filed in nehru nagar building accident case one arrested mumbai print news msr

ताज्या बातम्या