ऑस्ट्रेलियन युवतीचा विनयभंग

एका सामाजिक संस्थेसोबत अभ्यास करण्याच्या निमित्ताने आली होती.

प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबईतील कुलाबा येथे एका २० वर्षीय ऑस्ट्रेलियन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका टॅक्सीचालकाला शनिवारी अटक केली. जिया उल अन्सारी (३०) असे या टॅक्सीचालकाचे नाव असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ऑस्ट्रेलियन विद्यार्थिनी सहा आठवडय़ांच्या व्हिसावर मुंबईत एका सामाजिक संस्थेसोबत अभ्यास करण्याच्या निमित्ताने आली होती. कुलाबा येथील एका मुलींच्या वसतिगृहात ती राहत होती. मात्र २० जानेवारीला तिने एक टॅक्सी पकडली असता टॅक्सीचालक अन्सारी याने सीट बेल्ट लावण्याच्या बहाण्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. २३ जानेवारीलाही तिने नेमकी तीच टॅक्सी पकडल्यावर त्यादिवशीदेखील अन्सारी याने त्याच कृत्याची पुनरावृत्ती केली होती.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai crime news