Mumbai Crime : मुंबईतल्या एका गृहनिर्माण सोसायटीतल्या राड्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवार असल्याने सोसायटीतल्या सदस्यांसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत सदस्य आणि अध्यक्षांमध्ये चांगलीच जुंपली त्याचे पडसाद हाणामारीत झाले. या हाणामारीत सोसायटीच्या अध्यक्षाने एका सदस्याचा अंगठा कापल्याची घटना ( Mumbai Crime ) घडली. मुंबईतल्या दहीसरमध्ये असलेल्या म्हात्रेवाडीत ही घटना ( Mumbai Crime ) घडली.

नेमकं काय घडलं?

मुंबईतल्या दहीसर येथील पश्चिम म्हात्रेवाडी येथील अमरनाथ अपार्टमेंटमध्ये सकाळी सोसायटी अध्यक्षांकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला अध्यक्षांसह सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी, सोयायटी सदस्य आदित्य देसाई आणि सोसायटी अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. या झटापटीत अध्यक्ष नित्यानंद परिहार यांनी चक्क दाताने सदस्य असलेल्या आदित्य यांचा अंगठाच तोडल्याचा आरोप आदित्य देसाई यांनी ( Mumbai Crime ) केला आहे. या घटनेनं ( Mumbai Crime ) सोसायटीत चांगलीच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सोसायटी अध्यक्षाने अंगठा चावला आदित्य देसाईंना जखमी केलं

अमरनाथ सोसायटीत झालेला वाद हा इतका विकोपाला गेला की नित्यानंद परिहार याने आदित्य देसाई या सदस्याचा अंगठा चावला. आदित्य देसाई यांचा अंगठा या घटनेमुळे तुटून जमिनीवर पडला. या घटनेनंतर आदित्य देसाई यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस या प्रकरणी ( Mumbai Crime ) पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा- Wife Circulates Intimate Video : पतीचे विवाहबाह्य संबंध, पत्नीने व्हायरल केले खासगी फोटो; तक्रारदार महिला म्हणते, “घरी कोणी नसताना…”

आदित्य देसाईंवर उपचार

आदित्य देसाई यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. त्यांच्या हाताला ड्रेसिंग करण्यात आलं आहे. या प्रकरणी ( Mumbai Crime ) एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. कालच मुंबईत आत्महत्या आणि हत्येची घटना समोर आली होती. आता त्यानंतर दहीसरची घटना समोर आली आहे.

मुंबईत पत्नीची हत्या केल्यानंतर पतीची आत्महत्या

मुंबईत हत्या आणि आत्महत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती देण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तीही घरात मृतावस्थेत आढळून आली. महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली, जेव्हा ५८ वर्षीय किशोर पेडणेकर यांचा मृतदेह जवाहरनगरमधील टोपीवाला मॅन्शनसमोर रस्त्यावर आढळून आला. किशोर पेडणेकर हा व्यवसाय करायचा. त्यांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.