scorecardresearch

धक्कादायक! मुंबईत माथेफिरूचा शेजाऱ्यावर हल्ला, चार जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

आरोपी मानसिक तणावात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली.

crime
प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबईत एका धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रँट रोड येथे एका ५४ वर्षीय माथेफिरूने एकाच वेळी पाच जणांवर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ग्रँट रोड येथील पार्वती मॅन्शन इमारतीत दुपारी ३.३० च्या सुमारास घडली.

या घटनेनंतर ५४ वर्षीय आरोपी चेतन गाला याला डीबी मार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपी गाला हा मानसिक तणावात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली.

हेही वाचा : विरार येथे रेल्वे अपघात, रेल्वे रूळ ओलांडताना एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, चेतन गाला याच्या कुटुंबीयांनी त्याला सोडलं आहे. त्याच्या शेजाऱ्यांनी कुटुंबाला भडकवल्याचा संशय त्याच्या मनात होता. त्याच कारणाने तो मानसिक तणावात होता. याच रागातून शुक्रवारी ( २४ मार्च ) शेजारील घरात जात कुटुंबातील सदस्यांवर गालाने हल्ला केला.

हेही वाचा : अँटिलिया प्रकरणात सुनील माने यांचा सक्रिय सहभाग; माफीचा साक्षीदार होण्याच्या विनंतीला एनआयएचा विरोध

या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर गिरगावातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी चेतन गाला याला अटक केली. त्याच्यावर कलम ३०२ नुसार डीबी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 20:52 IST

संबंधित बातम्या