Mumbai Crime : मुंबईत एका महिलेची ६ लाख ५० हजारांना फसवणूक ( Mumbai Crime ) झाली आहे. ४५ वर्षीय महिलेने जुनं फर्निचर विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने ऑनलाईन जाहिरात पोस्ट केली. मात्र तिची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात मंगळवारी ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्या महिलेची फसवणूक ( Mumbai Crime ) करण्यात आली ती महिला तिच्या कुटुंबासर जोगेश्वरी पश्चिम या भागात राहते. या महिलेचे पती बँकेत नोकरी करतात. तसंच ते मुंबईत रहात नाही तर कतारमध्ये वास्तव्यास असतात.

पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेने एका प्रतिथयश क्लासिफाईड साईटवर घरातलं जुनं फर्निचर विकण्याची जाहिरात पोस्ट केली होती. तिने पोस्ट केल्यानंतर काही वेळातच तिला एक फोन कॉल आला. सदर माणसाने या महिलेने ज्या फर्निचरचे फोटो पोस्ट केले होते ते पाहून ते विकत घेण्यात रस दाखवला. मी १५ हजारांना हे फर्निचर विकत घेतो कारण मला तुम्ही पोस्ट केलेले फोटो आवडले आहेत असं या माणसाने सदर महिलेला सांगितलं. त्यानंतर या माणसाने फर्निचर विकत घेण्यासाठीची आगाऊ रक्कम म्हणून पाच हजार रुपयेही या महिलेला ( Mumbai Crime ) पाठवले.

मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
migratory birds arrived at mumbai bay
विदेशी पाहुण्यांचा मुंबई खाडीकिनारी विहार
Sadhvi Pragya Sing Thakur
Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञा यांनी पोस्ट केला सुजलेल्या चेहऱ्याचा फोटो; म्हणाल्या, “मी जगले वाचले तर काँग्रेसच्या टॉर्चरविरोधात…”
Canada News
Canada : चिथावणीखोर वक्तव्याबद्दल कॅनडातील ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिराच्या पुजाऱ्याची हकालपट्टी
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

महिलेची फसवणूक नेमकी कशी झाली?

यानंतर नंतर या माणसाने तुमचा क्यूआर कोड पाठवला. तो म्हणाला मी तुम्हाला उरलेले पैसे याच कोडने पाठवतो. तुम्ही कोड स्कॅन करा. महिला कोड स्कॅन करत होती तेव्हा तिला कळलं की हा पैसे पाठवण्यासाठीचा कोड आहे मिळवण्यासाठीचा नाही. तिने ही बाब त्या माणसाला सांगितली त्यावर तो माणूस तिला म्हणाला होय सुरुवातीला तुमच्या अकाऊंटमधून थोडेसे पैसे जातील पण ते तुम्हाला रिफंड होतील. ही प्रोसेस तशीच आहे. यानंतर या महिलेने त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे १४ हजार ९९५ रुपये रिफंड ( Mumbai Crime ) येतील म्हणून या माणसाला पाठवले. यानंतर सदर कॉलरने महिलेकडे विविध रक्कम ट्रान्सफर करुन मागितली आणि लवकरच ही रक्कम रिफंड ( Mumbai Crime ) येईल असं सांगितलं. महिलेने जेव्हा एकूण किती पैसे ट्रान्सफर केले हे बेरीज करुन पाहिलं तर ती रक्कम ६ लाख ४८ हजार इतकी होती. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. एवढंच नाही तर सदर माणसाने या महिलेला ही खात्रीही दिली की तुमचे पैसे ऑनलाईन आले नाहीत तर मी तुम्हाला रोखीने ते पैसे देईन तुम्ही चिंता करु नका.

पोलिसांनी या प्रकरणी शोध सुरु केला आहे

h

h

महिलेने विश्वासाने इतके पैसे पाठवले पण नंतर तिने त्या माणसाला फोन करायचा प्रयत्न केला तो फोन स्विच ऑफ होता. तसंच पैसेही परत आलेच नाहीत. त्यामुळे या ४५ वर्षीय महिलेला लक्षात आलं की आपली फसवणूक ( Mumbai Crime ) झाली आहे. यानंतर सदर महिलेने पोलीस ठाण्यात धाव खघेतली. आम्ही सदर महिलेने तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंदवून घेतला आहे असं पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणात कलम ३१८ फसवणूक आणि ३१९ (२) या कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. आम्ही सदर माणसाचा शोध घेत आहोत असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Story img Loader