Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी एका महिलेला तिच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतल्या वांद्रे भागात हे जोडपं राहतं. आरोपी महिलेविरोधात तिच्या एक्स बॉयफ्रेंडला धमकी देऊन १० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. मला १० लाख रुपये दे नाहीतर तुला बलात्काराच्या खोट्या आरोपांत अडकवेन अशी धमकी या महिलेने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला ( Mumbai Crime ) दिली. तसंच ती वारंवार त्याला धमक्या देत होती. या प्रकरणात आता पोलिसांनी सदर महिलेसह तिच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे हे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ सप्टेंबरला या प्रकरणाची ( Mumbai Crime ) नोंद करण्यात आली. ही महिला २०-२१ वर्षांची असताना तिचा प्रियकर होता. मात्र त्यांच्या नात्याला महिलेच्या वडिलांनी नकार दिला. त्यानंतर या महिलेचं लग्न झालं. या घटनेनंतर मागच्या वर्षी तिचा एक्स बॉय़फ्रेंड आणि ती दोघंही पहिल्यांदा भेटले. माझं रेस्तराँ सुरु करण्याचं स्वप्न आहे, त्यासाठी तू पैसे गुंतव असं या महिलेने तिच्या माजी प्रियकराला सांगितलं होतं. मात्र त्याने पैसे गुंतवले नाहीत. यानंतर या महिलेने त्याला धमकी ( Mumbai Crime ) दिली की बघ तुझी कशी बदनामी करते. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सदर महिलेने या दोघांचं जे भूतकाळातलं नातं होतं त्याबाबत कुटुंबाला आणि मित्रांना सांगण्यास सुरुवात केली असा आरोप तिच्या माजी प्रियकराने केला आहे.
हे पण वाचा- नालासोपाऱ्यात १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, दोन जणांना अटक
काय म्हटलं आहे महिलेच्या एक्स बॉयफ्रेंडने?
“तिने मला १० लाख रुपये मागितले, मी ते दिले नाही तर बलात्काराच्या खोट्या प्रकरणांत अडकवण्याची धमकी ( Mumbai Crime ) दिली. तसंच तू पैसे दे नाहीतर मी आत्महत्या करेन असंही तिने धमकावलं. माझा एक भाऊ वरिष्ठ अधिकारी आहे, मला तुझ्या विरोधात बलात्काराची तक्रार ( Mumbai Crime ) करायची असेल तर फार वेळ लागणार नाही, तू बरबाद होशील आणि त्या प्रकरणात अडकशील.मला फक्त तिनेच नाही तर तिच्या नवऱ्यानेही याच प्रकारे धमक्या दिल्या.” असं महिलेच्या माजी प्रियकराने पोलीस तक्रारीत म्हटल्याचं पोलीस सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
काही महिन्यांपासून ब्लॅकमेलिंग सुरु
गेल्या काही महिन्यांपासून मला ब्लॅकमेल करणं सुरु आहे. असाही आरोप महिलेच्या एक्स बॉयफ्रेंडने केला आहे. यानंतर वांद्रे पोलिसांनी खंडणी मागणे, बदनामी कऱणे, शिव्या देणं, धमकी देणं कट रचणं अशा विविध कलमांखाली सदर महिला आणि तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत. मुंबईतल्या वांद्रे भागातली ही घटना आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.