Dadar Suitcase Murder: मुंबईतल्या दादर सूटकेस हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. कारण या प्रकरणी आता हत्या झालेल्या अर्शद हत्या प्रकरणात त्याची पत्नी रुखसानाला पोलिसांनी अटक केली आहे. ४ ऑगस्टला अर्शदची दोघांनी हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह दोघांनी दादरच्या तुतारी एक्स्प्रेसमधून घेऊन जात होते. मात्र पोलिसांना या दोघांच्या हालचालींवर संशय आला आणि त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आता हत्या झालेल्या अर्शदच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय घडली?

दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ११ येथे दोन मूक बधिर व्यक्ती तुतारी एक्सप्रेसमध्ये ( Dadar Suitcase Murder ) चढत होते. या दोघांकडे चाकं असलेली एक ट्रॉली बॅग होती. मात्र, ही बॅग ट्रेनमध्ये चढवताना या दोघांची प्रचंड दमछाक झाली होती. बॅगेच्या वजनामुळे दोघांनाही बॅग रेल्वे गाडीत चढवताना चांगलाच घाम फुटला होता. त्यावेळी या फलाटावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव आणि पोलीस अंमलदार माधव केंद्रे हे गस्तीवर होते. त्यांना या दोन्ही व्यक्तींची हालचाली बघून संशय आला. त्यामुळे त्यांनी या दोघांना थांबवून बॅग उघडायला सांगितली. ही बॅग उघडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. या बॅगेत रक्ताने माखलेला एक मृतदेह ( Dadar Suitcase Murder ) कोंबून ठेवला होता. या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर घाव होते. पोलिसांनी संबंधित व्यक्ती आणि बॅग ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली. या तपासणीत हा मृतदेह (Dadar Suitcase Murder ) अर्शद अली सादिक अली शेख (वय ३०) याचा असल्याचे समजलं. आता अर्शद अली सादिक शेखची हत्या का आणि कशी झाली? ते समोर आलं आहे. आरोपी पायधुनीतून दादरला आले होते. अर्शद याची हत्या ( Dadar Suitcase Murder) शिवजीत सिंग आणि जय चावडा यांनी का केली? हे आता समोर आलं आहे. आता अर्शदच्या पत्नीमुळे ही हत्या झाल्याचं समोर येतं आहे. रुखसाना आणि जय यांचे अनैतिक संबंध होते अशी माहिती समोर आली आहे.

रुखसानाचं नेमकं काय कनेक्शन?

जय चावडा, शिवजीत सिंग हे दोघंही मूक बधिर असल्याने त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी पोलिसांना साईन लँग्वेज एक्स्पर्टची मदत घ्यावी लागली. अशात आता रुखसाना आणि जय चावडा यांचे अनैतिक संबंध होते अशी माहिती समोर येते आहे. रुखसानाने तिचे What’s App चॅट रविवारी डिलिट केले होते. एवढंच नाही तर अर्शदची हत्या ( Dadar Suitcase Murder ) करण्यापूर्वी जय चावडा आणि शिवजीत सिंग यांनी अर्शदला टॉर्चर केलं होतं. त्याला विवस्त्र करुन मारहाण केली. तसंच मारहाण करताना त्याचा व्हिडीओही काढला होता. त्यांच्या बेळगावमध्ये राहणाऱ्या मित्राला व्हिडीओ कॉल करुन त्यांनी ही मारहाण दाखवली होती. अर्शदची हत्या केल्यानंतर त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह जय आणि शिवजीतने बॅगेत भरला. त्याच्या मृतदेहाची कोकणात जाऊन विल्हेवाट लावायची असं त्यांनी ठरवलं होतं. मात्र त्यांचा हा कट पोलिसांमुळे उघडकीस आला आणि या हत्येची उकल झाली.

हे पण वाचा- “महिलेचा फोटो, ब्लॅकमेलिंग आणि…” तुतारी एक्स्प्रेसमधील सूटकेस हत्या प्रकरणी नवा अँगल समोर

पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्शदची पत्नी रुखसाना ही देखील मूक बधिर आहे. तिला दोन मुलं आहेत. एवढंच नाही तर जय चावडा आणि तिचे संबंध होते. दोघंही विविध व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये होते अशीही माहिती समोर आली आहे. जय चावडाचं कुटुंब कॅनडात आहे तो चांगलाच श्रीमंत आहे. तसंच तो अविवाहीत आहे. त्याच्या पायधुनी येथील घरात अर्शद शेखची हत्या (Dadar Suitcase Murder ) करण्यात आली.

अर्शदचा भाऊ इर्शादने नेमका काय आरोप केला आहे?

जय चावडा आणि रुखसाना यांच्यात असलेल्या संबंधातूनच अर्शदला ठार करण्याचा कट (Dadar Suitcase Murder ) आखला गेला असा आरोप अर्शदचा भाऊ इर्शादनेही केला आहे. आता या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत. जय चावडा आणि अर्शद यांच्या सहा महिन्यांपूर्वी एक भांडण झालं होतं त्याचं कारणही आम्ही शोधत आहोत असंही पोलिसांनी म्हटलं आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

मुंबईतल्या सूटकेस मर्डरची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. तसंच या प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे. (प्रतीकात्मक फोटो-ग्राफिक्स टीम लोकसत्ता)

अर्शद शेख लहानसहान कामं करुन त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने त्याची पायधुनी येथे राहणाऱ्या जय चावडा आणि शिवजित सिंग यांच्याशी ओळख झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून हे सगळे एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान जय चावडा आणि अर्शदची पत्नी रुखसाना यांचीही ओळख झाली. या दोघांमध्ये प्रेमसंबंध फुलले आणि रुखसाना जय चावडा याच्यासोबत अनैतिक संबंध ठेवले होते असा आरोप अर्शदच्या भावाने केला आहे.