मुंबई : मुंबई ठाण्यामध्ये शनिवारी दहीहंडी मोठ्या उत्साहात पार पडली. मात्र दहीहंडी उत्सवादरम्यान तब्बल ३८३ गोविंदा जखमी झाले. या गोविंदांवर मुंबईतील विविध सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. जखमींपैकी ५३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ३०६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

दहीहंही फोडताना थरावरून खाली पडून जखमी झालेल्या ३८३ गोविंदा जखमी झाले. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहरामध्ये १९० गोविंदा जखमी झाले, तर पूर्व उपनगरामध्ये ६७ आणि पश्चिम उपनगरामध्ये १२६ गोविंदा जखमी झाले आहेत. केईएम रुग्णालयात ७७ रुग्णांना उपचारासाठी नेण्यात आले. यातील १८ जणांना रुग्णालयात दाखल केले, तर ५९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

नायर रुग्णालयात ३५ जखमी गोविंदा नेण्यात आले असून, यातील ३ जणांना रुग्णालयात दाखल केले असून, ३२ जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. शीव रुग्णालयात २१ जखमी गोविंदा नेण्यात आले असून, यातील २ जणांना रुग्णालयात दाखल केले असून, १९ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. राजावाडी रुग्णालयात ३३ जखमी गोविंदा नेण्यात आले असून, यातील १५ जणांना रुग्णालयात दाखल केले असून, १८ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

कांदिवली शताब्दी रुग्णालयात २० जखमी गोविंदा नेण्यात आले असून, यातील २ जणांना रुग्णालयात दाखल केले असून १८ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात ३४ जखमी गोविंदा नेण्यात आले असून, यातील २ जणांना रुग्णालयात दाखल केले असून, ३२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. व्ही. एन. देसाई रुग्णालयात ३३ जखमी गोविंदा नेण्यात आले, या सर्व गोविंदांना उपचार करून घरी सोडण्यात आले.