मुंबई : सप्टेंबर महिन्यात पाऊस पडल्यामुळे मुंबईकरांवर असलेली पाणीकपातीची समस्या आता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये शुक्रवारी पहाटे एकूण ९९.३३ इतक्या पाण्याची नोंद झाली. धरणामध्ये उपलब्ध असणारा पाणीसाठा वर्षभर पुरेल एवढा असल्यामुळे आता पाणीकपात करण्याची आवश्यकता नसल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> “मुंबईत मराठी माणसाला घर नाकारण्याची हिंमत….”, तृप्ती देवरुखकरांच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाडांचा सरकारला सवाल

पुणे: शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यांची होणार स्वच्छता, हे आहे कारण !
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
water tariff hike over the citizens of Ahilyanagar
अहिल्यानगरमधील नागरिकांवर पाणीपट्टी वाढीची टांगती तलवार
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
Mumbai water supply cut
भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद, ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद
All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?

मुंबई शहर व उपनगरांना ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. या सातही धरणांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३५३ दशलक्ष लिटर इतकी आहे. यंदा पावसाचा लपंडाव पाहता मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागाद्वारे ऑक्टोबर महिन्यात पाणीकपात करण्याची शक्यता वर्तविली होती. ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईकरांच्या डोक्यावर पाणीकपातीची टांगती तलवार होती. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सातही धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणीकपातीचा निर्णय जाहीर करण्यात येणार होता. मात्र, सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची तहान भागणार असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा >>> मुंबईः दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला १२ तासांत अटक; मुलाची सुखरूप सुटका

जूनमध्ये आटलेली पाण्याची पातळी लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने मुंबईवर १० टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र, जुलैमध्ये दिलासादायक पाऊस पडल्याने पालिका प्रशासनाने ८ ऑगस्ट रोजी पाणीकपात मागे घेतली होती. तसेच,जुलै महिन्यात तुळशी, विहार, तानसा आणि मोडकसागर हे चार तलाव ओसंडून वाहू लागले होते. मात्र, ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने पुन्हा पाणीकपातीची चिंता वाढली होती. सद्यस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये १४ लाख ३७ हजार ११५ दशलक्ष इतका पाणीसाठा जमा झाला आहे. उपलब्ध पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत अधिक आहे. मागील वर्षी हा पाणीसाठा १४ लाख २२ हजार ०९२ इतका होता. तसेच सध्या ऊर्ध्व वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

धरणांमध्ये उपलब्ध असणारा पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

२९ सप्टेंबर २०२३ – १४ लाख ३७ हजार ७१५

२९ सप्टेंबर २०२२ – १४ लाख २२ हजार ०९२

२९ सप्टेंबर २०२१ – १४ लाख ३२ हजार ३२८

Story img Loader