scorecardresearch

आईच्या मृतदेहाचे तुकडे लपवले स्टीलच्या टाकीत, दुर्गंधी पसरू नये म्हणून…; मुंबईतील थरकाप उडवणारी घटना

शेजारी आईबाबत सातत्याने विचारत असल्याने तरूणीने….

Veena-Prakash-Jain-and-daughter-Rimple
आईच्या मृतदेहाचे तुकडे करून लपवलं स्टीलच्या टाकीत, दुर्गंधी पसरू नये म्हणून…; मुंबईतील थरकाप उडवणारी घटना

मुंबईत एका धक्कादायक घटना समोर आली आहे. लालबाग परिसरातील एका चाळीत तरूणी तिच्या आईच्या मृतदेहाबरोबर गेल्या तीन महिन्यांपासून राहत होती. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तरूणीला बुधवारी अटक केली आहे. वीणा जैन असं मृत महिलेचं, तर रिंपल जैन असं अटक करण्यात आलेल्या तरूणीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मंगळवारी रिंपलचा चुलत भाऊ तिच्या घरी पैसे देण्यासाठी गेला होता. तेव्हा वीणा जैन दिसत नसल्याने कुठं आहे, असं भावाने रिंपलला विचारलं. तर, ती कानपूरला गेल्याचं तिने म्हटलं. पण, संशय आल्याने त्याने रिंपलला दरवाजा उघडण्यास सांगितलं. जेव्हा तो घरात गेला, त्याला दुर्गंधी परसल्याचं दिसलं.”

हेही वाचा : अमृता फडणवीसांना धमकी, लाच देण्याचा प्रकार, देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेत धक्कादायक खुलासे; नक्की काय म्हणाले?

“याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घराची पाहणी केली असता, वस्तु सर्वत्र पसरल्या होत्या आणि दुर्गंध सुटली होती. दुर्गंधीचा तपास केला असता एका छोट्या टाकीत हात आणि पाय सापडले. याची तात्काळ माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत रिंपलला ताब्यात घेण्यात आलं. तर, मृतदेह केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला,” असं पोलिसांनी सांगितलं.

झोन ४ चे डीसीपी प्रवीण मुंढेंनी म्हटलं, “तपासादरम्यान कटर, कोयता आणि सुरी सापडला आहे. संशयित आरोपी सतत तिचे विधान बदलत आहे. तिच्यावर कलम ३०२ आणि २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

हेही वाचा : १ कोटींची लाच, धमकी आणि कट रचल्याचा आरोप, अमृता फडणवीसांची डिझायनरविरोधात मुंबईत तक्रार; नेमकं प्रकरण काय?

दुर्गंध लपवण्यासाठी परफ्यूमचा वापर

रिंपलेने आईच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर दुर्गंधी लपण्यासाठी २०० परफ्यूम घेतले होते. जेव्हा विकत घेण्यासाठी बाहेर जायची, तेव्हा शेजारचे दुर्गंधीबाबत बोलायचं. तेव्हा रिंपल स्टीलच्या टाकीवर परफ्यूम फवारायाची. तसेच, शेजारी आईबाबत सातत्याने विचारत असल्याने तिने बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला होता.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 15:13 IST
ताज्या बातम्या