Mumbai Cruise Drug Case: अनन्या पांडेची आज तिसऱ्यांदा चौकशी होणार; NCB ने बजावले समन्स

आधीच्या चौकशीत काहीही ठोस पुरावे आढळले नसल्याने तिला सोमवारी म्हणजे आज पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

Ananya Pandey

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिला मुंबई क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणात आज पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश अमली पदार्थ नियंत्रण विभागाने दिले आहेत. याच प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. अनन्याची आज तिसऱ्यांदा चौकशी होणार आहे.

गेल्या गुरुवारी अनन्याला पहिल्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी दोन तास तिची चौकशी करण्यात आली. तिच्याकडचे दोन मोबाइल आणि तिचा लॅपटॉपही एनसीबीने ताब्यात घेतला. त्यानंतर चौकशीची दुसरी फेरी शुक्रवारी झाली. त्यावेळी साधारणतः चार तास तिची चौकशी करण्यात आली. मात्र या चौकशीत काहीही ठोस पुरावे आढळले नसल्याने तिला सोमवारी म्हणजे आज पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘एनसीबी’वरील आरोपांच्या चौकशीची मागणी ; ‘एसआयटी’ नेमण्यासाठी मलिक आग्रही

अनन्या आणि आर्यन या दोघांमधले ड्रग्जच्या संदर्भातले चॅट्स समोर आल्यानंतर तिला पहिल्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं. हे दोघेही गांजाबद्दल चर्चा करत होते. एनसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन अनन्याला गांजाविषयी विचारत होता. ती गांजा मिळवण्यासाठी काही ‘जुगाड’ करू शकते का? असंही त्याने तिला विचारलं. त्यावर ‘मी तुला ते मिळवून देईन’ असं उत्तर अनन्याने दिलं.

एनसीबीच्या तपास अधिकाऱ्यांनी जेव्हा हे चॅट अनन्याला दाखवून त्याविषयी तिला विचारलं, त्यावेळी आपण केवळ थट्टा करत असल्याचं तिने अधिकारऱ्यांना सांगितलं. या चॅट्सशिवाय अनन्याने आर्यनला ड्रग्ज पुरवले याविषयीचे कोणतेही पुरावे एनसीबीच्या हाती लागलेले नाहीत. गुरुवारी झालेल्या चौकशीदरम्यान अनन्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की तिने आत्तापर्यंत कधीही ड्रग्ज घेतलेले नाहीत आणि आर्यनसोबतचे हे चॅट्स साधारण एका वर्षापूर्वीचे आहेत, त्यामुळे तिला याबद्दल अधिक काही आठवत नाही. ती म्हणाली की गांजा हा अमली पदार्थ असतो हे तिला माहिती नव्हतं असं इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai drugs case ananya panday summoned questioning ncb today vsk

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या