Mumbai Drugs Case:….म्हणून आर्यन खानच्या जामीनावरील सुनावणीआधी न्यायाधीशांनी कोर्ट केलं रिकामं

सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाच्या कोर्टरूमध्ये न्यायमूर्ती सांबरे यांनी उपस्थित असलेल्या सर्वांनाच फटकारले आहे.

Mumbai Drugs Case Aryan Khan Hearing Judge Gets Courtroom Cleared Over Covid Rule Violation

मुंबई क्रूझ ड्र्ग्ज प्रकरणात आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आर्यनला मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालय आणि विशेष अमली पदार्थ विरोधी न्यायालयाने दोनदा जामीन नाकारला होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी वेशात मुंबईतील क्रूझ शिप पार्टीवर छापा टाकला होता. त्यानंतर आता या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाच्या कोर्टरूमध्ये न्यायमूर्ती सांबरे यांनी उपस्थित असलेल्या सर्वांनाच फटकारले आहे.

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यापासून हे प्रकरण हाय प्रोफाईल बनले आहे. त्यामुळे प्रत्येक जण याबाबत जाणून घेण्यासाठी उस्तुक आहे. प्रकरणाच्या सुरुवातीपासून आर्यन खानच्या जामीनाबाबत सर्वजण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आर्यन खानच्या सुनावणीदरम्यान कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यात येत आहे. या गर्दीमध्ये करोना नियमांचे पालन होत नसल्याने मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती सांबरे चांगलेच भडकले.

कोर्ट-रूममध्ये कोविड नियमांचे पालन केले जात नसल्याने न्यायमूर्ती सांबरे उठून निघून गेले होते. सुनावणी दरम्यान कोर्टरूम खचाखच भरलेली होती. एका न्यायालयीन कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार केवळ मॅटर क्रमांक ४५-५५ संबधित असलेल्यांनीच न्यायालयात थांबावे. अन्यथा कोर्टाचे कामकाज सुरु होणार नाही असे म्हटले.

त्यांनतर न्यायमूर्ती सांबरे कोर्टरुम रिकामे होण्याची वाट पाहत होते. न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी इतर सर्वांना न्यायालयाबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना तेथून बाहेर काढले. लोक कोर्टरूममधून बाहेर पडावेत यासाठी न्यायमूर्ती सांबरेंनी पोलीस दल देखील पाठवले होते.

त्यानंतर पोलिसांच्या मदतीने कोर्ट रूम रिकामी करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या खटल्यात हजर असलेले वकील वगळता सर्वच न्यायालयाच्या बाहेर राहतील. खटला संपल्यावर प्रवेश दिला जाईल, असे आश्वासन न्यायमूर्ती सांबरे यांनी दिले. पोलिसांनी ओळखपत्र तपासल्यानंतर पत्रकारांना एकामागून एक आत जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर कोर्ट रूममध्ये केवळ पत्रकार आणि पुढील प्रकरणामध्ये उपस्थित असलेल्या वकिलांनाच न्यायालयात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai drugs case aryan khan hearing judge gets courtroom cleared over covid rule violation abn

ताज्या बातम्या