Aryan Khan Case : व्हॉट्सअप चॅटमधून मोठा खुलासा; ड्रग्जबद्दल एका अभिनेत्रीनंही केलेली आर्यनसोबत चर्चा

आर्यन खानने एका नवोदित अभिनेत्रीसोबतही ड्रग्जसंबंधी चॅट केलं होतं असं समोर आलं आहे

Mumbai Drugs Case, Aryan Khan Bail Hearing, आर्यन खान जामीन सुनावणी, एनसीबी,
क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. (File Photo: PTI)

क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी शाहरुख खान सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यामुळे आर्यन खानला जामीन मिळणार की दिवाळीदेखील तुरुंगात घालवावी लागणार हे पहावं लागणार आहे. मात्र आर्यन खानला अडचणीत आणणारा आणखी एक पुरावा एनसीबीने कोर्टासमोर सादर केला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

आर्यन खानला क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी २ ऑक्टोबरला अटक करण्यात आली असून सध्या तो जेलमध्ये आहे. आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान एनसीबीने जामीनाच्या सुनावणीआधी आर्यन खानने एका अभिनेत्रीसोबत ड्रग्जसंबंधी चॅटिंग केल्याची माहिती कोर्टात दिली आहे. एनसीबीने हे संभाषण कोर्टात सादर केलं आहे. गेल्या सुनावणीत एनसीबीने कोर्टात ही माहिती दिली आहे.

आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी राम कदम यांची प्रार्थना; म्हणाले “कोणी श्रीमंत, गरीब अभिनेता असो…”

एनसीबीने आर्यन खानच्या मोबाइलमधील चॅटिंग तपासलं असून याआधीही अनेक संभाषणांचा उल्लेख केला आहे. दरम्यान यावेळी आर्यन खानने एका नवोदित अभिनेत्रीसोबतही ड्रग्जसंबंधी चॅट केलं होतं असं समोर आलं आहे. २ ऑक्टोबरला झालेल्या क्रूझ पार्टीतल्या ड्रग्जसंबंधी दोघांमध्ये बोलणं झालं होतं. याच पार्टीनंतर आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेत नंतर अटकेची कारवाई केली होती.

शिवसेना नेत्याची सर्वोच्च न्यायालयात धाव

या अभिनेत्री आणि आर्यन खानमध्ये अनेकदा ड्रग्जवरुन चॅटिंग झालं आहे. याआधी एनसीबीने आर्यन खानचं काही ड्रग्ज तस्करांसोबत संभाषण झाल्याचे पुरावे दिले होते.

आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. आज याप्रकरणी सुनावणी होणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट यांच्यासहित एकूण सहा जणांना एनसीबीने २ ऑक्टोबरला छापा टाकून ताब्यात घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai drugs case ncb aryan khan chats discussing drugs with actress submitted in court sgy