अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या मुंबईड क्रुझ ड्रग्ज केस प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. तर, या प्रकरणातील केंद्रबिंदू ठरलेल्या आर्यन खानला अखेर काल उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. मात्र असं जरी असलं तरी त्याची आज तुरूंगामधून सुटका होणार की नाही? याबाबत अद्याही संभ्रम कायम आहे. कारण, पुढील प्रक्रीय आज जर वेळत पूर्ण झाली नाही, तर आर्यनला आजची रात्र देखील तुरुंगातच घालावावी लागू शकते. आर्यनाच्या जामीनाची प्रत अद्यापही उच्च न्यायालयाकडून मिळालेली नाही. त्यामुळे ही प्रत मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया आज वेळेत होईल का? याबाबत साशंकता आहे.

आज दुपारी साडेतान वाजेपर्यंत हायकोर्टाच्या आदेशाची प्रत हाती येण्याची शक्यता मुनमुन धमेचा वकीलाने वर्तवली आहे. यानंतर या सुटकेचे आदेश साडेपाचपर्यंत भायखाळा जेलमध्ये पोहचतील व त्यानंतर तासाभरात आर्यनसह अरबाज व मुनमुन यांची आजच सुटका होऊ शकते. मात्र या प्रक्रियेत कुठे विलंब झाला तर मात्र या तिघांनाही आजची रात्र ऑर्थर रोड तुरुंगात काढावी लागणार आहे आणि मग उद्या सकाळी त्यांची अखेर सुटका होईल.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला क्रूझवरील पार्टीप्रकरणी उच्च न्यायालयाने अखेर गुरुवारी जामीन मंजूर केला. परंतु, जामिनाच्या अटींबाबतचा आदेश आज (शुक्रवारी) देण्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याने २५ दिवसांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या आर्यनची आज किंवा उद्या (शनिवारी) सुटका होऊ शकते. आर्यनसह त्याचा मित्र आणि प्रकरणातील सहआरोपी अरबाज र्मचट व मुनमुन धमेचा यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

आर्यन खानला जामीन ; उच्च न्यायालयाचा निर्णय

केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आर्यनच्या जामिनाला केलेला विरोध खोडून काढणारा युक्तिवाद आर्यनच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहटगी यांनी केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आर्यन आणि अन्य दोन याचिकाकर्त्यांच्या याचिका मंजूर केल्या. जामीन मंजूर का करण्यात आला, याचा तपशीलवार आदेश शुक्रवारी सायंकाळपर्यंत देणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर रोख रकमेवर आर्यनची सुटका करण्याची विनंती रोहटगी यांनी केली. त्यांची ही विनंती न्यायालयाने फेटाळली आणि हमीदारांच्या अटीवर जामीन मंजूर करण्याचे नमूद केले.