मुंबई : देश-विदेशातूनही अनेक पर्यटक मुंबईतील गणेश दर्शनासाठी येतात. मुंबईतील सार्वजनिक, प्रसिद्ध गणेश मंडळे आणि गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. दिवसा बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतात. परंतु रात्रीच्या वेळी कमी प्रमाणात बेस्टच्या सेवा उपलब्ध असतात. त्यामुळे भाविक आणि पर्यटकांसाठी ७ ते १६ सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. हेही वाचा - मुंबई : गणेशोत्सव काळात सागरी किनारा मार्ग २४ तास खुला, वाहतुकीत बदल हेही वाचा - डेटिंग ॲप फसवणूकप्रकरणी सहा जणांना अटक, सर्व आरोपी नवी दिल्लीतील रहिवासी कुलाबा परिसरातून उत्तर-पश्चिम मुंबईकडे गिरगाव, लालबाग, परळ, चेंबूरमार्गे बस चालविण्यात येणार आहेत. बसमार्ग क्रमांक ४ मर्या. जे.जे रुग्णालय ते ओशिवरा आगार, ८ मर्या. जिजामाता उद्यान ते शिवाजी नगर, ए - २१ डॉ. एस.पी.एम. चौक ते देवनार आगार, ए -२५ बॅकबे आगार ते कुर्ला आगार, ए-४२ कमला नेहरू पार्क ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानक, ४४ वरळी व्हिलेज ते एस. यशवंते चौक (काळाचौकी), ६६ इलेक्ट्रीक हाऊस ते सांताक्रूझ आगार, ६९ डॉ. एस.पी.एम. चौक ते पी.टी. उद्यान, शिवडी, व सी -५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते काळाकिल्ला आगार या बसमार्गावर रात्रीच्या जादा बस फेऱ्या धावतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.