झिरो सिनेमाच्या सेटवर आग

अग्निशमन दलाचे जवान आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत

zero poster
'झिरो'

मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीत लागलेली आग ही शाहरुख खानच्या झिरो या सिनेमाच्या सेटवर लागल्याची माहिती समोर आली आहे. पीटीआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. आग लागल्याची घटना घडली तेव्हा अभिनेता शाहरुख खान तिथे हजर होता असेही समजते आहे. अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी रवाना झाले असून आग नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो आहे. ही आग नेमकी का लागली ते स्पष्ट झालेले नाही. स्टुडिओवरच्या सेटवरून अचानक धूर येऊ लागला. बहुदा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वर्तवला आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला या सिनेमाचे ट्रेलर रिलिज झाले होते. या सिनेमात शाहरुख खान, कतरीना कैफ आणि अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai fire breaks out in film city goregaon four fire tenders at the spot

ताज्या बातम्या