गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया १३ जानेवारीपासून सुरू होत आहे. तब्बल ९१० अग्निशामक पदासाठी ही भरती होणार आहे. सात वर्षांनंतर ही भरती होत असून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सरळसेवा (वॉक इन सिलेक्शन) पद्धतीने होणारी ही भरती ४ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

हेही वाचा >>>मुंबईः टेम्पोची धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू

adani electricity Increase fuel surcharge for may
अदानीची वीज महागली; मे महिन्यापासून इंधन अधिभारात वाढ
BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
india current account deficit narrows to 1 2 percent of gdp in quarter 3
चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रण; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत १०.५ अब्ज डॉलरवर

मुंबई अग्निशमन दलातील अग्निशामक पदासाठी अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या भरतीसाठीची बहुप्रतीक्षीत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मधल्या काळात मराठा आरक्षणाचा तिढा, टाळेबंदी व करोनामुळे अग्निशमन दलातील रखडलेली भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होत आहे. यापूर्वी २०१७ मध्ये भरती झाली होती. तशीच भरती आताही होणार आहे. किमान ५० टक्के गुण मिळवून १२ वी उत्तीर्ण झालेल्या इच्छुक उमेदवारांची पारंपरिक पद्धतीने शारीरिक तपासणी, वैद्यकीय तपासणी आदींचा या प्रक्रियेत समावेश आहे.

हेही वाचा >>>मुंबई: मुलुंडमध्ये घराची भिंत कोसळून एक महिला ठार, एक जखमी

मुंबई अग्निशमन दलात सुमारे तीन हजार अग्निशामक, अधिकारी, वाहनचालक असे मनुष्यबळ आहे. त्यापैकी अडीच हजार अग्निशामक आहेत. मात्र पदोन्नती किंवा निवृत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त झाली होती. रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. दहिसर पश्चिमेकडील भावदेवी मैदानात ही भरती प्रक्रिया होणार असून त्याचे चित्रीकरणही केले जाणार आहे. यावेळी १२० गुणांची मैदानी चाचणी, ८० गुणांची प्रमाणपत्र चाचणी होणार आहे.

प्रत्यक्ष रुजू होण्यास एक वर्ष लागणार
जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर १४ जानेवारी ते ४ फब्रुवारी या कालावधीत प्रत्यक्ष भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवार निवडीची प्रक्रिया वैद्यकीय चाचणी यासाठी दोन महिने लागणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांना प्रत्यक्षात अग्निशमन दलात रुजू होण्यास एक वर्ष लागणार आहे.

हेही वाचा >>>मुंबई: ‘मेट्रो ३’साठी दुसरी गाडी मुंबईत दाखल

वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली
टाळेबंदीमुळे पोलीस भरतीमध्ये जशी दोन वर्षांनी वयोमर्यादा वाढविण्यात आली तशीच सूट या भरतीतही देण्यात येणार असून त्याला नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता खुल्या गटासाठी वयोमर्यादा २५ ऐवजी २७ वर्षे असेल तर आरक्षणासाठी हीच मर्यादा ३० ऐवजी ३२ वर्षे असेल.

अशी आहेत पदे आरक्षित
माजी सैनिक – १३६ पदे
खेळाडू – ४६
प्रकल्पग्रस्त – ४६
भूकंपग्रस्त – १७
महिला – २७३
सर्वसाधारण आरक्षण – ३९२
अनाथ – ९
अपंग – ३७