मुंबई : वरळीत इमारतीमधील लिफ्ट कोसळल्याने चौघांचा मृत्यू

आज सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

lift collapsed in a building in Worli
दुर्घटमधील जखमींना तातडीने केईएम हॉस्पिटल व नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून दुर्घटनांचे सत्र सुरू असल्याचे दिसत आहे. अगोदर पावासाने राज्यभरात धुमाकुळ घातलेला असताना, आता वरळीत एक दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधील लिफ्ट कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना समोर आली आहे.

वरळीतील अंबिका बिल्डर्स शंकरराव पदपथ मार्ग ११८ व ११९ बीडीडी चाळ, हनुमान गल्लीत आज सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून, आणखी सहा जण आत अडकलेले असल्याची माहिती देखील समोर येत आहे. या दुर्घटमधील जखमींना तातडीने केईएम हॉस्पिटल व नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai four people died when a lift collapsed in a building in worli msr