गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे आर्जव करीत भाविकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप दिला आणि अवघ्या गणेश गजरात मुंबापुरी दुमदुमून गेली. करोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा झाला. गणेश चतुर्थीपासून दहा दिवस षोडशोपचार पूजा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देण्यात आला. मुंबईतील विसर्जन मिरवणूक तब्बल २१ तास सुरू होती. मुंबईतील मानाचा गणपती अशी ओळख असलेल्या लालबागचा राजाला गिरगाव चौपाटीवर शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास निरोप देण्यात आला. त्यानंतरही काही काळ मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते.

हेही वाचा >>>मुंबई : गणेश विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात
lakshmi narayan yoga 2024
एप्रिल महिना सुरु होताच या ३ राशींना मिळेल अपार पैसा; बुध-शुक्राच्या युतीमुळे निर्माण होईल लक्ष्मी नारायण योग!
pune farmers marathi news, pune holi farmers marathi news, farmers disappointed on holi marathi news
शेतकऱ्यांची निराशा! होळीच्या मुहूर्तावर बेदाणा, गुळाच्या दराचे काय झाले?

करोना संसर्गाच्या सावटामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागला होता. करोनाच्या भितीमुळे काही सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठा न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्य सरकारने करोना संसर्ग नियंत्रणात आल्याने सर्वच निर्बंध हटविले होते. त्यामुळे यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा झाला. परिणामी, घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत अनेक भागात ढोल-ताशाच्या तालावर वाजतगाजत, गुलालाची उधळम करीत आगमन मिरवणुका निघाल्या. अवघी मुंबापुरी गणरायाच्या गजराने दुमदुमली. त्यानंतर १० दिवस निरनिराळे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा केला. गणेश चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवारी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने ठिकठिकाणाहून मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.

हेही वाचा >>> सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांतील भेसळ वाढली ; लाखो रुपयांचे खाद्यतेल व अन्नपदार्थ जप्त

मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आदींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लालबाग परिसरात मोठी गर्दी केली होती. लालबाग परिसरात सकाळी ८.३० च्या सुमारास विसर्जन मिरवणूक सुरू झाली. गणेशगल्लीतील मुंबईचा राजा मार्गस्थ झाला. त्यानंतर हळूहळू अन्य मंडळांचे गणपती मार्गस्थ होऊ लागले. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी या परिसरात प्रचंड गर्दी केली होती. मात्र लालबागच्या राजाची मिरवणूक दुपारी १२ च्या सुमारास सुरू झाली. दरम्यान, कुलाबा, फोर्ट, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, मुंबई सेंट्रल यासह मुंबई आणि उपनगरांतील ठिकठिकाणच्या मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुका फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत ढोल-ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणुका गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटीसह विसर्जनस्थळाच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागल्या. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे आर्जव करीत भाविक गणरायाला निरोप देत होते. गणरायाच्या गजराने अवघी मुंबापुरी दुमदुमून गेली होती.

विसर्जनात कोणताही अनुचित प्रकरा घडू नये यासाठी मुंबई पोलीस दलाने कडोकोट बंदोबस्त ठेवला होता. तसेच वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी वाहतूक सज्ज होते. विसर्जन मार्गांवर मिरवणुकींना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी काही निवडक मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तर काही मार्गावर एकदिशा मार्गाने वाहतूक सुरू होती.