मुंबई : दीड दिवस गणपतीची मनोभावे सेवा केल्यानंतर अखेर त्याला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. गणपतीच्या विसर्जनासाठी समुद्रकिनारे, चौपाट्या आणि नैसर्गिक विसर्जनस्थळांकडे होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महापालिकेने विविध भागांत कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. भांडुप, घाटकोपर, विक्रोळी, पवई, कुर्ला यासह आसपासच्या परिसरात महापालिकेने एकूण ४५ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. तुमच्या घराजवळ नेमके कुठे आणि किती कृत्रिम तलाव आहेत, यांची अचूक माहिती खालीलप्रमाणे….
कुर्ला, पवई, चुनाभट्टी परिसरातील कृत्रिम तलाव
(एल विभाग) एकूण तलावांची संख्या – ९
१) छत्रपती शिवाजी महाराज तलाव, एम. एन. मार्ग, कुर्ला (पश्चिम) २) राजे शिवछत्रपती मनोरंजन मैदान, बीट क्र. १६६, न्यू मिल रोड, कुर्ला (पश्चिम) ३) छत्रपती संभाजी महाराज मैदान, बामनदया पाडा, पवई ४) वस्ताद लहुजी साळवे मैदान, विजय फायर मार्ग, चांदिवली ५) मोहीली महानगरपालिका शाळा, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, कुर्ला (पश्चिम) ६) छत्रपती शिवाजी महाराज मैदान, नेहरू नगर, कुर्ला (पूर्व) ७) छत्रपती शिवाजी महाराज मैदान, चुनाभट्टी, चुनाभट्टी (पूर्व) ८) छत्रपती शिवाजी महाराज तलाव, एल. बी. एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम) ९) आनंदीबाई सुर्वे उद्यान, जंगलेश्वर महादेव मंदीर मार्ग, असल्फा-मोहिली
घाटकोपर, विक्रोळी व आसपासच्या परिसरातील कृत्रिम तलाव
(एन विभाग) एकूण तलावांची संख्या – १२
१) दत्ताजी साळवी मार्ग मैदान, भटवाडी बीट क्र. १२८ २) बाबू गेणू मैदान, साईनाथ नगर बीट क्र. १२६ ३) माणिकलाल मेहता मार्ग, ६० फुटी रोड, बीट क्र. १२९, घाटकोपर (पश्चिम) ४) छत्रपती शिवाजी महाराज मैदान, पार्कसाईट, बीट क्र. १२३, विक्रोळी ५) मार्केट प्लॉट, रोड क्र. १७, बीट क्र. १२४, विक्रोळी ६) आचार्य अत्रे मैदान, पंतनगर, बीट क्र. १३१, घाटकोपर (पूर्व) ७) साई निवारा, घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, घाटकोपर (पूर्व) बीट क्र. १२५
मुलुंड व आसपासच्या परिसरातील कृत्रिम तलाव
(टी विभाग) – एकूण तलावांची संख्या – ७
१) मोरया तलाव, पूर्व द्रुतगती महामार्ग, मुलुंड (पूर्व) २) गणेश घाट, मिठागर मार्ग, मुलुंड (पूर्व) ३) पांडुरंग भोईर तलाव, हरी ओम नगर, मुलुंड (पूर्व) ४) स्वप्ननगरी, सरदार तारासिंह उद्यान, मुलुंड वसाहत, मुलुंड (पूर्व) ५) कालिदास नाट्यगृह, पी. के मार्ग, मुलुंड (पश्चिम) ६) न. भू. क्र. १४४, तालुका क्रीडा संकुल, वीर सावरकर मार्ग, मुलुंड (पूर्व) ७) सुरेश बारकू पाटील उद्यान, एन. सी. सी मार्ग, मुलुंड, (पश्चिम)
भांडुप, पवई, कांजूरमार्ग, विक्रोळी आसपासच्या परिसरातील कृत्रिम तलाव
(एस विभाग) एकूण तलावांची संख्या – १७
१) पवार वाडी घाट प्रवेशद्वार, जोगेश्वरी विक्रोळी जोडरस्ता, पवई २) बीट क्र.१०९ श्रीरामपाडा महानगरपालिका मैदान, भांडुप (पश्चिम) ३) बीट क्र. ११०, कैलास पार्क, ९० फूट रोड, तुलशेतपाडा भांडुप (पश्चिम) ४) बीट क्र. ११२, गुरू गोविंद सिंग मैदान, जी. एस. शेट्टी शाळेजवळ, व्हीलेज रोड, भांडुप (पश्चिम) ५) बीट क्र. ११३, ब्युटी हाईट बिल्डींग जवळ, गावदेवी रोड, भांडुप (पश्चिम) ६) बीट क्र.११४, लाला शेट कंम्पाउंड, टेंबीपाडा रोड, भांडुप (पश्चिम) ७) बीट क्र. ११५, क्रिटीकेअर हॉस्पीटल समोर, क्वेरी रोड, कोकण नगर, भांडुप (पश्चिम) ८) बीट क्र. ११६, स्कायलाईन बिल्डींग समोर, ९० फिट डीपी रोड, महाराष्ट्र नगर, भांडुप (पश्चिम) ९) बीट क्र. ११७, यशवंतराव चव्हाण मैदान (परिवार मैदान), परिवार सोसायटी, कांजूर (पूर्व) १०) बीट क्र. ११८, बालगंधर्व मैदानाजवळ, कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) ११) बीट क्र. ११८, राजर्षी शाहू महाराज मैदान, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व) १२) बीट क्र. ११९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व) १३) बीट क्र. १२१, त्रिकोणी उद्यान, मोरारजी नगर, पवई १४) पवई बीट क्र. १२२, श्री. हरीश्चंद्र शर्मा मैदान, तिरंदाज महानगरपालिका शाळेजवळ, १५) प्रमोद महाजन क्रीडांगण, टैंक मार्ग, भांडुप (पश्चिम) १६) बीट क्र. १११, भांडुपेश्वर कुंडासमोर, खुले मैदान, न. भू. क्र. ७३०, भांडुप (पूर्व) १७) सीटीएस क्र. ७/४, कोपरी गाव, पवई
