मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सहा फूट किंवा त्याहून कमी उंचीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी यंदा मुंबईत ३५० हून अधिक कृत्रिम तलाव तयार केले आहेत. त्यातील ७२ तलाव केवळ पालिकेच्या एफ दक्षिण, जी दक्षिण व जी उत्तर विभागात आहेत. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी गोंधळ होऊ नये, यासाठी दादर, परळ, वरळी, माहीम आणि शिवडी परिसरातील ७२ कृत्रिम तलावांची नेमकी ठिकाणे जाणून घेणे नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदाही लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात केले जाणार आहे. गतवर्षी महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांना गणेश भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कृत्रिम तलावांना मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन महापालिकेने यंदा ३५२ तलाव उभारले आहेत. परळ, प्रभादेवी, वरळी, दादर, शिवाजी पार्क, माहीम, काळाचौकी, धारावी, नायगांव येथील भाविकांच्या सोयीसाठी पालिकेने उभारलेल्या ७२ कृत्रिम तलावांची अचूक माहिती खालीलप्रमाणे….

एफ दक्षिण विभाग – एकूण कृत्रिम तलाव – २०

१) हाजी बंदर, शिवडी २) भवानीमाता क्रीडांगण मैदान, शिंदेवाडी, दादर (पूर्व), मुंबई – १४ ३) सदाकांत ढवण मैदान, गोविंदजी केणी मार्ग, भोईवाडा, परळ, मुंबई – १२ ४) बेळगाव – कारवार सह संयुक्त महाराष्ट्र संघर्ष स्मृती योजना मनोरंजन उद्यान ५) प्रबोधनकार ठाकरे उद्यान, आचार्य दोंदे मार्ग, शिवडी, मुंबई – १२ ६) मातोश्री इमारत क्र. ६ जवळ, जेरबाई वाडिया मार्ग, भोईवाडा, परळ, मुंबई – १२ ७) कामगार मैदान, गोखले सोसायटी लेन, आर. एम. भट्ट शाळेजवळ, परळ, मुंबई – १२ ८) मनोरंजन मैदान, गॅस कंपनी लेन ९) सद्गुरु भालचंद्र मैदान, अनंत मालवणकर मार्ग १०) गोदरेज मैदान, गुंदेचा गार्डन जवळ ११) लाल ओटा मैदान, एन. एल. परळकर मार्ग, परळगांव १२) देवजी परब मैदान, दत्ताराम लाड मार्ग १३) ”ओ” ब्लॉकसमोरील मैदान बेस्ट वसाहत १४) शहीद भगतसिंग मैदान, अभुदयनगर, काळाचौकी १५) विनायक वाबळे मैदान १६) बाल विकास मनोरंजन मैदान १७) साईबाबा पथ महानगरपालिका शाळा, मिंट कॉलनी जवळ, साईबाबा पथ. १८) पुरंदरे मैदान, एस. एस. वाघ, नायगाव

जी दक्षिण – एकूण कृत्रिम तलाव – ३२

१) श्रमिक जिमखाना २) चवन्नी गल्ली ३) आदर्श नगर स्पोर्टस् क्लब मैदान ४) बाबासाहेब वरळीकर उद्यान ५) जांबोरी मैदान ६) सफेद मैदान ७) हाजी अली शासकीय कर्मचारी निवास ८) महाराष्ट्र हायस्कूल मैदान ९) राजाभाऊ साळवी मैदान १०) आनंद निकेतन मैदान, मुरलीधर सामंत मार्ग ११) वीर नेताजी सुभाष मैदान १२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका शाळा मैदान १२) कै. सुनीता दत्ताजी नलावडे मैदान, गणपतराव कदम मार्ग, वरळी १४) सीटीएस क्र. १४१, फिनिक्स मॉल शेजारील मनपा भूखंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ

जी उत्तर विभाग – एकूण कृत्रिम तलाव – २०

१) कीर्ती कॉलेज २) सूर्यवंशी हॉल रोड ३) रानडे रोड विस्तार (चैत्यभूमी) ४) केळुस्कर रोड (दक्षिण) दादर ५) केळुस्कर रोड (उत्तर) दादर ६) हिंदुजा हॉस्पिटल माहीम ७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, वाल्मिकी रोड, एम. एल. कॅम्प ८) पर्ल रेसिडन्सी, संत रोहिदास मार्ग, धारावी ९) वाय जंक्शन, संत रोहिदास मार्ग १०) बृहन्मुंबई महानगरपालिका क्रीडाभवन, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर ११) चौधरी वाडी मैदान, एस. के. बोले क्रॉस रोड १२) केशवराव दाते उद्यान, आगाशे पथ, दादर १३) प्रमोद महाजन कला पार्क, सेनापती बापट मार्ग, दादर १४) ओम समर्थ व्यायाम मंदिर, बाळ गोविंद दास मार्ग, दादर १५) मृदुंगाचार्य मैदान, एस. व्ही. एस. मार्ग, माहीम १६) लोकमान्य शाळेजवळील मोकळी जागा, माहीम प्लॉट नं. २४९ १७) शिवराज मैदान, धारावी १८) शाहुनगर मैदान, शाहुनगर, धारावी