माफक भाडय़ाचे आश्वासन

मंबईकरांच्या सुसह्य़ प्रवासासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील दहिसर-डीएननगर व अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या दोन मार्गाच्या कामास आणि त्यासाठी लागणाऱ्या १२ हजार ६१८ हजार कोटी रुपयांच्या खर्चास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. दोन्ही मार्गावरील हे प्रकल्प मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. या दोन्ही मार्गावरील मेट्रो प्रवासासाठी १० ते ३० रुपयांपर्यंत माफक भाडे आकारले जाणार आहे.
मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा १७२ किलोमीटर लांबीचा बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्यातील प्राधान्यक्रम ठरवून सात प्रकल्पांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले आहे. या सात प्रकल्पांतून एकूण ११८ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे.
या बृहत आराखडय़ानुसार दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील दहिसर (पूर्व) ते डीएननगर या प्रकल्पात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) १ हजार ८९२ कोटी, राज्य शासनाचे कर्जापोटी ७५७ कोटी ५० लाख, केंद्र शासनाकडून कर्जपोटी २९२ कोटी ५० लाख, नाममात्र दरात जमीन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाचे साहाय्य म्हणून ६६५ कोटी आणि एमएमआरडीएचे कर्ज स्वरूपात २ हजार ८०३ कोटी रुपये असा आर्थिक सहभाग असणार आहे.
मुंबई मेट्रो मार्ग-७ मधील अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) हा मार्ग पूर्णत: उन्नत स्वरूपातील आहे. या प्रकल्पात एमएमआरडीएचे २ हजार ३२० कोटी, राज्य शासनाचे कर्जापोटी ७३३ कोटी ५० लाख, केंद्र शासनचे कर्जापोटी ३०२ कोटी ५० लाख, नाममात्र दराने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाचे ६०६ कोटी, एमएमआरडीएचे कर्ज स्वरूपात २ हजार २४६ कोटी, याप्रमाणे भांडवल उभारण्यात येणार आहे.

दहिसर (पूर्व)
ते डीएननगर
लांबी – १८.६० किलोमीटर.
खर्च – ६ हजार ४१० कोटी रुपये. स्थानके – १७.
ल्लल्ल
अंधेरी (पूर्व)
ते दहिसर (पूर्व)
लांबी – १६.५ किलोमीटर.
खर्च – ६ हजार २०८ कोटी रुपये. स्थानके झ्र् १६

भाडे..

० ते ३ कि.मी. १० रु.
३ ते १२ कि.मी. २० रु.
१२ कि.मी. पुढे ३० रु.