मुंबई : मागील दोन दिवसांपासून उन्हाचे चटके आणि उष्मा काहीसा कमी झाला आहे. तसेच चाळिशीच्या आसपास असलेले तापमान आता थेट ३४ अंशावर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना कडक उन्हापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मुंबई, तसेच उपनगरांत रविवारपासून हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होणार असून तापमान ३४ अंश सेल्सिअसदरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना उन्हाचे चटके आणि असल्य उकाडा सोसावा लागत होते. मात्र, बुधवारपासून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्यामुळे ३९ आणि ४० अंशावर गेलेले तापमान आता थेट ३४ अंशावर आले आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. मुंबईत शनिवारी उष्ण व दमट हवामान राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३३.५ तर, सांताक्रूझ केंद्रात ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रावरील तापमान शुक्रवारच्या तुलनेत १ अंशांनी वाढल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, मुंबई शहर तसेच उपनगरांत रविवारपासून आर्द्रतेत घट होऊन उष्मा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता हवामान विभागाो वर्तविली आहे.

हेही वाचा…पनवेल – नांदेडदरम्यान ४० उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या

गेल्या काही दिवसांतील कमाल तापमान

सोमवार,१५ एप्रिल

कुलाबा- ३४.७, सांताक्रूझ – ३७.९

मंगळवार, १६ एप्रिल
कुलाबा – ३५.२ , सांताक्रूझ – ३९.७

बुधवार, १७ एप्रिल
कुलाबा – ३४, सांताक्रूझ – ३४.७
गुरुवार, १८ एप्रिल

हेही वाचा…दादर रेल्वे स्थानकावर लॉरेन्स बिष्णोई टोळीचा गुंड, पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनी

कुलाबा- ३३.२ , सांताक्रूझ – ३४.४
शुक्रवार, १९ एप्रिल

कुलाबा- ३३.७, सांताक्रूझ – ३४.८