मुंबई : घाटकोपर येथील दुर्घटनेत झालेल्या जखमींची भेट घेण्यासाठी मंगळवारी विविध पक्षाच्या नेत्यांनी राजावाडी रुग्णालयात भेट दिली. यावेळी घडलेल्या प्रकरणावर रुग्णाच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. जखमी रुग्णांना जाहीर झालेला निधी प्रत्यक्षात मिळेल का, आता उपचाराचा खर्च कसा करायचा असे प्रश्न नातेवाईकांकडून विचारण्यात येत होते. नेत्यांच्याबरोबर असणारा लवाजमा, गर्दी सुरक्षेमुळे होणारी अडचण याबाबतही नातेवाईकांचा रोष व्यक्त होत होता.

राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ३८ रुग्णांमध्ये २ महिला रुग्णांचा समावेश आहे. त्यातील अनेक रूग्णांना डोक्याला मार लागला आहे. काहींचे हात – पाय मोडले आहेत. त्यातील बहुसंख्य रुग्ण हे परिवाराचा आधार असल्यामुळे रुग्णांचे नातेवाई हतबल झाले आहेत. मुळातच जखमी नातेवाईकाची चिंता, खर्चाची तजवीज, औषधे, खाणे-पिणे याची सोय करताना होणारी पळापळ यांमुळे तणावात असलेल्या नातेवाईकांच्या मनस्तापात नेत्यांच्या भेटींनी भर घातली. नेत्यांबरोबर येणारा लवाजमा, तेचतेच प्रश्न, छायाचित्रे, गर्दी यांमुळे नातेवाईकांच्या संयमाची परीक्षा होती.

Bahujan samaj party marathi news
बसपाच्या बैठकीत ‘हायहोल्टज ड्रामा’, महिलेने चक्क पदाधिकाऱ्यांच्या…
Navi Mumbai Police, Kharghar, Mobile shop theft, Juveniles detained, Stolen goods recovered CCTV footage, Criminal Investigation Department, kharaghar news, navi Mumbai news, latest news,
खारघर येथील चोरी प्रकरणात पावणेचार लाखांच्या मुद्देमालासह तीन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात 
bjp, illegal building
डोंबिवलीतील सागाव येथील बेकायदा इमारत तोडण्यास भाजप पदाधिकाऱ्यांचा अडथळा, उच्च न्यायालयाच्या इमारत तोडण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष
IAS officer Puja Khedkar MBBS Admission
IAS Puja Khedkar used OBC quota : कोट्यवधींची संपत्ती असलेल्या पूजा खेडकर यांनी MBBS चा प्रवेशही ओबीसी कोट्यातून घेतला
Pooja Khedkar Audi
Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार जप्त, कागदपत्र सादर करण्याचे निर्देश; ‘एवढ्या’ रुपयांचा दंडही ठोठावला!
Sangli, criminals, police, Sangli police,
सांगली : पोलिसांच्या झाडाझडतीत ६० गुन्हेगारांवर कारवाई
loksatta analysis reason behind cbi raid on neeri 4 state including in nagpur
विश्लेषण : नीरी’ संस्थेवरील सीबीआय छाप्यांमुळे खळबळ का उडाली? संचालकानेच संस्थेचे मातेरे कसे केले?
Investigation closed by ED too Failure to trace the source of income in the offenses against the vicar
‘ईडी’कडूनही तपास बंद? वायकर यांच्या विरोधातील गुन्ह्यांत उत्पन्नाचा स्राोत शोधण्यात अपयश

हेही वाचा : मुंबईत एकूण १०२५ महाकाय फलक; सर्वाधिक फलक अंधेरी, वांद्रे, ग्रॅन्टरोडमध्ये, तब्बल १७९ फलक बेकायदेशीर

दुर्घटनेतील मृतांना आर्थिक मदत करण्याचे जाहीर केल्यानंतर जखमींना केली जाणारी आर्थिक मदत कितपत पुरेशी आहे, असा प्रश्न नातेवाईकांकडून विचारण्यात येत होता. जखमी झालेल्या अनेकांवर त्यांचे संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे. फलक अनधिकृत होते तर पालिका काय करत होती पालिकेला ते फलक दिसलेच नाही का, असा संताप व्यक्त करण्यात येत होता.

माझा मोठा भाऊ सुरेंद्र मोर्या सोमवारी सायंकाळी चार चाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. तो गाडीसह फलकाखाली अडकला. त्याला एका तासानंतर बाहेर काढण्यात आले. त्याच्या मानेला, छातीला आणि हाताला दुखापत झाली आहे. मानेची जखम गंभीर असून त्यावर शत्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. जखमींना मदत जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात ती मिळेल अशी अशा नाही.

जितेंद्र मोर्या ( जखमी सुरेंद्र मोर्याचे भाऊ)

हेही वाचा : कुटुंबातील कमावते गेल्याने दुःखाचा डोंगर; भरत राठोड, मोहम्मद अक्रम यांचा मृत्यू

सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान मी आणि माझा नवरा पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो असताना फलक कोसळला. मी फलकापासून थोडी लांब उभी होते. त्यामुळे माझ्या मानेला दुखापत झाली. रुग्णालयात आल्यापासून माझ्या मानेचा एक्स-रे आणि एमआरए काढण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान मला इथे आणले पण तेव्हापासून फक्त पोलिसांनी येऊन माझा जबाब घेतला. मंगळवारी नेते आल्याचे कळले मात्र ते आमच्यापर्यंत आले नाहीत. सरकारने घोषित केलेल्या मदतीबद्दलही आम्हाला काही सांगण्यात आलेले नाही.

शबाना शेख ( जखमी महिला )