कुलदीप घायवट

विविध प्रकारचे समुद्री जलचर, सस्तन प्राणी, पक्ष्यांचे हक्काचे निवासस्थान कांदळवन आहे. मात्र कांदळवनामधील बहुसंख्य जीवांवर परिपूर्ण संशोधन न झाल्याने त्या प्रजातींची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे निसर्गचक्रातील त्यांचे महत्त्व आणि वेगळे गुणधर्म उघड झालेले नाहीत. यामधील एक जलचर प्रजाती म्हणजे ‘स्कॉर्पियन मड लॉबस्टर’ आहे. दलदलीच्या भागात वास्तव्य करणारे आणि कोळंबी, विंचवासारखी शरीररचना असल्याने त्याला ‘स्कॉर्पियन मड लॉबस्टर’ म्हटले जाते. थॅलसिनिडे कुटुंबातील क्रस्टेशियन कुळातील (खेकडे कुळातील जलचर प्राणी) थॅलेसियन अनोमाला ही प्रजाती आहे.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ

मुंबईतील कांदळवन परिसंस्थेत मड लॉबस्टर आढळून येतात. कांदळवनाच्या झाडाच्या मुळाशी चिखलापासून वारूळसदृश ढिगारे तयार करून मड लॉबस्टर राहतात. हे कांदळवन परिसंस्थेतील कमी ज्ञात, परंतु महत्त्वाचे क्रस्टेशियन आहेत. कांदळवनाची परिसंस्था टिकवून ठेवण्यासाठी मड लॉबस्टर महत्त्वाची भूमिका बजावतात. मड लॉबस्टरचे ढिगारे हे एक प्रकारे ज्वालीमुखीच्या ज्वालाकुंडासारखे दिसून येतात. या प्रजातीच्या शरीररचनेमुळे स्थानिक कोळी बांधव याला पाणिवचू, विंचू म्हणून संबोधतात. रात्रीच्या वेळी मड लॉबस्टर वारुळातून बाहेर पडून उपजीविका करतात. त्यामुळे वारुळे सर्रासपणे दिसून येतात. मात्र, लॉबस्टर सहज दिसत नाहीत. लॉबस्टर हे चिखलातील पोषक घटक खातात. ते सामान्यत: १६ ते २० सेमी लांबीचे असून शरीर पिवळे, लालसर-तपकिरी असते. शिवडी येथील कांदळवनाच्या परिसरात चिखलाची वारुळे दिसून येतात. मात्र, खेकडय़ांद्वारे द्धा चिखलापासून ढिगारे केले जात असल्याने मड लॉबस्टर प्रकाराकडे कोणाचे लक्ष गेलेले नाही.

हल्लीच शिवडीला केशरी आणि चमकदार रंगाच्या नांग्याने चिखल उकरून वारूळ तयार करताना मरिन लाइफ ऑफ मुंबईचे प्रदीप पाताडे यांना मड लॉबस्टर दिसून आले. जून २०१९ ते जुलै २०२१ या कालावधीत जीवशास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या परिसरात थॅलासीना अनोमाला आढळून आले. त्यामुळे राज्यातील आंतरभरती भागातील सर्वात कमी अभ्यासलेल्या प्रजातीचा मागोवा घेणे सोयीस्कर झाले आहे.

(स्रोत : कांदळवन कक्ष संकेतस्थळ)