मुंबई: रूळाखालील सिमेंट बॉक्स बदलल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने

ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा वेग मंदावल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. दिवसभर ही वेगमर्यादा कायम राहण्याची शक्यता

हार्बर मार्गावरील चेंबूर जवळ रेल्वे रूळाखालील सिमेंट बॉक्स बदलल्याने या मार्गावरील लोकल सेवा सुमारे १० ते १५ मिनिटे धीम्या गतीने सुरू आहे. बॉक्स बदलल्याने रेल्वेच्या वेगावर बंधने आली आहेत. ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा वेग मंदावल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. दिवसभर ही वेगमर्यादा कायम राहण्याची शक्यता असून याचा परिणाम हार्बर मार्गावर दिसून येणार आहे. यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai harbour line local service late for technical reason