मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान रविवारी ब्लाॅक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी – कल्याण या मुख्य मार्गावर कोणताही ब्लाॅक घेण्यात येणार नाही.
हेही वाचा
हार्बर मार्ग
- कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
- कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० दरम्यान
- परिणाम : सीएसएमटीवरून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा, तसेच सीएसएमटीवरून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ दरम्यान वांद्रे / गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी १५.२० पर्यंत सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा, तसेच गोरेगाव / वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल स्थगित करण्यात आल्या आहेत. मेगाब्लाॅक कालावधीत पनवेल – कुर्लादरम्यान दर २० मिनिटांच्या अंतराने विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. सकाळी १०.०० ते सायंकाळी ६ पर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्गावरून आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करण्याची मुभा असेल.
