हार्बर मार्गावर गोवंडी स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्याने मंगळवारी सकाळी हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी तब्बल एका तासाचा अवधी लागल्याने हार्बर मार्गावरील १३ सेवा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे या मार्गावर गाडय़ा अर्धा तास उशिराने धावत
होत्या.
गोवंडी स्थानकाजवळ मंगळवारी सकाळी ७.२०च्या सुमारास रुळाला तडा गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. हा तडा सांधण्यासाठी एका तासाचा कालावधी लागला. सकाळी ८.२३ वाजता हे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावरून वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. या टप्प्यातून गाडय़ा कमी वेगाने नेल्या जात असल्याने गाडय़ा उशिरानेच धावत होत्या. या कालावधीत हार्बर मार्गावरील १३ सेवा रद्द करण्यात आल्या. सुदैवाने ईदची सुटी असल्याने नोकरदार प्रवाशांची संख्या अत्यल्प होती.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jul 2014 रोजी प्रकाशित
रेल्वेरुळाला तडा गेल्याने हार्बर विस्कळीत
हार्बर मार्गावर गोवंडी स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्याने मंगळवारी सकाळी हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
Written by admin
First published on: 30-07-2014 at 02:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai harbour line services disturbed
