Porn Film Case: अभिनेत्री गहनाला तिसऱ्या गुन्ह्यात अटक होणार?, अटकपूर्व जामीन हायकोर्टाने ठेवला राखून

पॉर्न फिल्म प्रकरणातील तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी अभिनेत्री गहना वसिष्ठ हिने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

Gehana-Vashith-hc
Porn Film Case: अभिनेत्री गहनाला तिसऱ्या गुन्ह्यात अटक होणार?, अटकपूर्व जामीन हायकोर्टाने ठेवला राखून

पॉर्न फिल्म प्रकरणातील तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी अभिनेत्री गहना वसिष्ठ हिने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावरील सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाने आधीच्या सुनावणीत सध्याच्या प्रकरणात गहनाच्या कोठडीची आवश्यकता का आहे?, असं पोलिसांना स्पष्ट करण्यास सांगितलं होतं. त्यावर सरकारी वकिलांनी “गहनाच्या कोठडीची आवश्यकता नाही. पण कंपन्या आणि विविध कलाकारांसोबत केलेले स्वाक्षरी करार आवश्यक आहेत.”, असं सांगितलं होतं. तर बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी तिसऱ्या गुन्ह्यात आणखी काही कलमं जोडण्यासाठी कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल आहे. कलम ३७० अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे, असं सांगितलं. न्यायाधीशांनी ३७० कलामाबद्दल आधीच्या सुनावणीत विचारणा केली होती. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयात हे कलम जोडण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरूद्ध त्याच्याकडून काम करून घेणे अशी तरतूद कलम ३७० मध्ये आहे.

वकील अभिषेक येंडे यांनी अभिनेत्री गहना वसिष्ठ हिची बाजू न्यायालयासमोर मांडली. ” सध्याच्या गुन्ह्यात ३७० हे कलम जोडलं जाऊ नये. कारण सध्याच्या गुन्ह्यात तक्रारदाराने तिला रेकॉर्ड केलेल्या वेब सीरिजमध्ये काम करण्यास हरकत नाही असं सांगितलं होतं. तसेच तिने वसिष्ठसोबत करार केला होता.”, असा युक्तिवाद गहनाच्या वकिलाने केला.

दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण आदेशासाठी राखून ठेवलं आहे. त्यामुळे आता गहना वसिष्ठला अटकपूर्व जामीन मिळतो की नाही? याकडे लक्ष लागून आहे. यापूर्वी दोन प्रकरणात गहना वसिष्ठला अटक झाली होती. त्यानंतर तिची जामीनावर सुटका झाल्यानंतर तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गहनाने तिच्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai high court reserves order in anticipatory bail application of gehana vasisth rmt