मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीदरम्यान २४ वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तर जून महिन्यात सलग सहा दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे.
मुंबई महापालिकेने पावसाळ्यातील भरती – ओहोटीचे वेळापत्रक जाहीर केले. भरती काळादरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, तसेच या अनुषंगाने प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. मुंबईत गिरगाव, दादर, जुहू, माहीम, वर्सोवा, आक्सा, गोराई अशा सात मोठ्या चौपाट्या आहेत. तसेच मरीन ड्राईव्ह, वरळी, वांद्रे येथे समुद्री पदपथ आणि बसण्यासाठी कट्टा आहे. या ठिकाणी पावसाळ्यात नागरिक मोठ्या प्रमाणावर लाटांचा आनंद घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे पालिकेने वरील आवाहन केले आहे.
अतिवृष्टी झाली तर मुंबई तुंबणार…
चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या मुंबईला पावसाळ्यात मोठ्या भरतीचाही धोका असतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असला तरी साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार असतील आणि त्याचवेळी मुसळधार पाऊस कोसळल्यास पाण्याचा निचरा नैसर्गिक पद्धतीने होत नाही. त्याउलट समुद्राच्या भरतीचे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमधून शहरात शिरते. त्यामुळे सखल भागात पाणी साचते. त्यामुळे भरती – ओहोटीच्या वेळा या मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. भरती आणि अतिवृष्टी दोन्ही एकाच वेळी आले तर मुंबईत शंभर टक्के पाणी तुंबते. त्यामुळे मुंबईकरांना पावसाचा अंदाज घेऊनच आपल्या कामाचे नियोजन करावे लागणार आहे.
असे आहे भरतीचे वेळापत्रक
जून २०२६
रविवार, १४.०६.२०२६
सकाळी – ११.२४ वा. –
लाटांची उंची (मीटर्स) – ४.६५
सोमवार, १५.०६.२०२६
दुपारी – १२.१४ वा.
लाटांची उंची (मीटर्स) – ४.८०
मंगळवार, १६.०६.२०२६
दुपारी – ०१.०५ वा.
लाटांची उंची (मीटर्स) – ४.८७
बुधवार, १७.०६.२०२६
दुपारी – ०१.५५ वा.
लाटांची उंची (मीटर्स) – ४.८६
गुरुवार, १८.०६.२०२६दुपारी – ०२.४४ वा.
लाटांची उंची (मीटर्स) – ४.७९
शुक्रवार, १९.०६.२०२६दुपारी – ०३.३२ वा.
लाटांची उंची (मीटर्स) – ४.६४
जुलै २०२६
सोमवार,
१३.०७.२०२६
सकाळी – ११.१४ वा.
लाटांची उंची (मीटर्स) – ४.५३
मंगळवार, १४.०७.२०२६
दुपारी – १२.०४ वा.
लाटांची उंची (मीटर्स) – ४.७३
बुधवार, १५.०७.२०२६
दुपारी – १२.५१ वा.
लाटांची उंची (मीटर्स) – ४.८५
गुरुवार, १६.०७.२०२६दुपारी – ०१.३६ वा.
लाटांची उंची (मीटर्स) – ४.८९
शुक्रवार, १७.०७.२०२६दुपारी – ०२.१९ वा.
लाटांची उंची (मीटर्स) – ४.८३
शनिवार, १८.०७.२०२६
दुपारी – ०३.०० वा.लाटांची उंची (मीटर्स) – ४.६६
