मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सीएसटी रेल्वे स्थानकाच्या नावात लवकरच बदल केला जाणार आहे. सध्या मुंबई विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे आहे. तर यापूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावातही बदल होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता ‘छत्रपती शिवाजी’ या नावापुढे महाराज हे आदरार्थी संबोधन लावण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबई विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ तर सीएसटी स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नावाने ओळखले जाईल.
Mumbai Int'l Airport to be renamed as Chhatrapati Shivaji Maharaj Int'l Airport. CST to be renamed as Chhatrapati Shivaji Maharaj Terminal
— ANI (@ANI_news) December 8, 2016
यापूर्वी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस होते. या स्थानकाचा युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय वारसा स्थळांमध्ये समावेश आहे. मार्च १९९६ मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस हे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस असे करण्यात आले. देशातील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या स्थानकांपैकी एक म्हणून सीएसटीची ओळख आहे. याशिवाय, सीएसटीला मध्य रेल्वेचे मुख्यालयही आहे. या स्थानकांवरून अनेक उपनगरी आणि एक्स्प्रेस गाड्या सुटतात.