मुंबई: राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना थेट नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयाेजन मंगळवारी राज्यभरात केरण्यात येणार आहे. मुंबई शहरात २० ठिकाणी हे रोजगार मेळावे पार पडणार आहेत. मुंबई शहर व परिसरातील सर्व खाजगी कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, बँकिंग, रिटेल, आयटी, मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्रातील उद्योजकांना यासाठी निमंत्रित करण्यात आले असून १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा आणि इतर व्यावसायिक कौशल्य असणारे सर्व पात्र उमेदवार या मेळाव्यात व प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. उमेदवारांनी त्वरित https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवर जाऊन आपली पूर्व-नोंदणी पूर्ण करावी.

मुंबईत चर्चगेट,माटुंगा, फोर्ट, दादर, सायन, वडाळा, भायखळा आदी २० ठिकाणी हे रोजगार मेळावे पार पडणार आहेत. यामध्ये एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ (चर्चगेट), रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (फोर्ट), एमव्हीआयआरडीसी जागतिक व्यापार केंद्र (कफ परेड) आणि न्यायवैद्यक शास्त्र संस्था (एचबीएसयू) (फोर्ट/चर्चगेट).

तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये सेंट झेवियर्स तांत्रिक संस्था (माहीम), मुंबई तांत्रिक अभियांत्रिकी विद्यालय (दादर/मुंबई), अंजुमन-ए-इस्लामचे एम.एच. साबू सिद्दिक तंत्रनिकेतन (भायखळा) तसेच ए.आय.चे आतिथ्य व्यवस्थापन संस्थान (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, गुरु नानक खालसा महाविद्यालय, श्रीमती मणीबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालय आणि डी. जी. रुपारेल माटुंगा येथे आहे.

गुरु नानक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायन येथे, तर एस.आय.डब्ल्यू.एस. एन. आर. स्वामी महाविद्यालय व श्रीमती थिरुमलाई महाविद्यालय वडाळा येथे आहे. याशिवाय सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय (फोर्ट), डेव्हलर्न तंत्रज्ञान प्रायव्हेट लिमिटेड (दादर), जय हिंद महाविद्यालय, सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय (चर्चगेट), भवन एच. सोमाणी महाविद्यालय (गिरगाव/चौपाटी) तसेच लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय (महालक्ष्मी) येथे रोजगार मेळावे होणार आहेत.