‘नीट’मध्ये मुंबईची कार्तिका नायर देशात पहिली

राष्ट्रीय चाचणी कक्षाने (एनटीए) १२ सप्टेंबर रोजी ही परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल अखेर सोमवारी जाहीर झाला.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल सोमवारी  जाहीर झाला असून हैदराबाद येथील मृणाल कुट्टेरी, दिल्ली येथील तन्मय गुप्ता आणि मुंबईची र्काितका नायर यांनी पैकीच्या पैकी (७२०) गुण मिळवून देश पातळीवर पहिला क्रमांक पटकावला आहे.

राष्ट्रीय चाचणी कक्षाने (एनटीए) १२ सप्टेंबर रोजी ही परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल अखेर सोमवारी जाहीर झाला. देशभरातील १६ लाख १४ हजार ७७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८ लाख ७० हजार ७४ विद्यार्थी प्रवेशपात्र ठरले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेश पात्रता गुण कमी झाले आहेत. एकूण ७२० गुणांपैकी साधारण १३८ पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी प्रवेशास पात्र असतील. गेल्यावर्षी प्रवेश पात्रता गुण १४७ होते. दरम्यान देशातील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची संख्या एक लाखाने वाढली आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai karthika nair was first in the country in neet akp