मुंबई : आईसक्रीमचे आमीष दाखवून ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला साकीनाका पोलिसांनी रविवारी अटक केली. खेळणारी मुलगी बेपत्ता झाल्यानंतर मुलीचा शोध घेतला असता आरोपी पीडित मुलीसह रिक्षात सापडला. त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपीविरोधात विनयभंग, अपहरण व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – तरुणीचे अश्लील चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित, परदेशातून आरोपी आल्यानंतर विमानतळावर पकडले

हेही वाचा – आरटीई कायद्यातील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती, एक किमी परिघातील खासगी शाळांना सूट देण्यावर बोट

पीडित मुलगी शनिवारी रात्री घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला आईसक्रीम देण्याचे आमीष दाखवले. त्यानंतर ३० वर्षीय आरोपी पीडित मुलीला त्याच्यासह घेऊन गेला. मुलगी गायब झाल्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. यावेळी स्थानिक नागरिकही तिच्या शोधात निघाले. यावेळी रात्री उशीरा पीडित मुलगी एका रिक्षात आरोपीसह सापडली. याप्रकरणानंतर स्थानिकांनी आरोपीला पकडून साकीनाका पोलीस ठाण्यात आणले व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितले. घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग, अपहरण व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.