लोकलचे दोन डबे घसरल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईत शनिवारी सीएसटी रेल्वेस्थानकात शिरताना हार्बर मार्गावरील लोकलचे दोन डबे घसरले. पनवेल-सीएसटी लोकल सीएसटी स्थानकातील दोन क्रमांकाच्या फलाटावर येताना या गाडीचे मागचे डबे रूळावरून अचानकपणे खाली उतरले.

मुंबईत शनिवारी सीएसटी रेल्वेस्थानकात शिरताना हार्बर मार्गावरील लोकलचे दोन डबे घसरले. पनवेल-सीएसटी लोकल सीएसटी स्थानकातील दोन क्रमांकाच्या फलाटावर येताना या गाडीचे मागचे डबे रूळावरून अचानकपणे खाली उतरले. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे एक आणि दोन क्रमांकाच्या फलाटावरील वाहतूक तीन क्रमांकाच्या फलाटावर वळविण्यात आली आहे. सुदैवाने आज सुट्टीचा दिवस असल्याने रेल्वे वाहतुकीवर याचा फार मोठा परिणाम झालेला दिसत नाही. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai local derail at cst to panvel

ताज्या बातम्या