मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील पनवेल – वाशी विभागांदरम्यानच्या हार्बर मार्गावर; तसेच पनवेल आणि ठाणे विभागांदरम्यानच्या ट्रान्स हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यासाठी रविवार मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल – वाशी अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ९.४५ ते दुपारी ३.४९ दरम्यान

परिणाम : पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील हार्बर सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत पनवेल/बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

ट्रान्स हार्बर मार्ग

कुठे : पनवेल – ठाणे अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी १०.०१ ते दुपारी ३.५३ दरम्यान

परिणाम : पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ दरम्यान ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील ट्रान्स-हार्बर सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० दरम्यान पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावर लोकल उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत पोर्ट मार्गिकेवरील लोकल उपलब्ध असतील.

पश्चिम रेल्वे

कुठे : सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान

परिणाम : ब्लॉक कालावधीत, जलद मार्गावरील सर्व लोकल

सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर धावतील.

या ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर काही बोरिवली आणि अंधेरी लोकल हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत धावतील.