लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू असल्याने पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नाही. मध्य रेल्वेवर ब्लॉक घेतल्यामुळे गणेशभक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

मध्य रेल्वे

कुठे : विद्याविहार ते ठाणे पाचव्या – सहाव्या मार्गावर

कधी : सकाळी ८.०० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या / येणाऱ्या डाऊन आणि अप मेल / एक्स्प्रेस विद्याविहार स्थानकावर अनुक्रमे डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाणे स्थानकावर अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.

आणखी वाचा-नायर रुग्णालय प्रकरण : वैद्यकीय विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाप्रकरणी सहयोगी प्राध्यापकाचे निलंबन

हार्बर मार्ग

कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन मार्ग, सीएसएमटी ते वांद्रे / गोरेगाव अप आणि डाऊन मार्ग बंद असेल. ब्लॉक कालावधीत कुर्ला – पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.