मुंबई : मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-कल्याण, कर्जत मार्गांवरील लोकल काही तांत्रिक कारणांमुळे बुधवारी रात्री नऊ वाजल्यापासून विलंबाने धावत आहे. त्यामुळे सीएसएमटीसह सर्वच स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली असून काही लोकल फेऱ्या रद्दही करण्यात आल्या आहेत.

दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक चार जवळ सायंकाळी सहाच्या सुमारास रूळ ओलांडताना सीएसएमटी-अंबरनाथ लोकलची धडक लागून अपघात झाला. त्यामुळे अपघातग्रस्ताला रुळावरून बाजूला करून उपचारासाठी नेईपर्यंत लोकल पंधरा मिनिटे थांबून राहिली. त्यामुळे कल्याण, अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यानंतर विद्याविहारवरून परेल स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या एका रिकाम्या एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. कुर्ला-सायन स्थानक दरम्यान रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. अप मार्गावरील हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी या स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. साधारण पंधरा मिनिटांच्या दुरुस्ती कामानंतर पुन्हा हा मार्ग पूर्ववत करण्यात आला.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

मात्र त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावू लागल्या त्यामुळे सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकलही विलंबाने सुटत होत्या.

सीएसएमटीला येणाऱ्या लोकल उशिराने येत असल्याने सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकलही विलंबाने सुटत असल्याची उदघोषणा सीएसएमटी स्थानकात रात्री नऊ वाजल्यापासून होऊ लागली आहे. सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गर्दी झाली आहे.