मुंबईकरांना दिलासा! एका दिवसाच्या प्रवासासाठी मिळणार लोकलचं तिकीट; मात्र ‘ही’ अट असणारच…

काही महत्वाच्या वैद्यकीय कारणांमुळे ज्या लोकांना लस घेता येत नाही अशांनाही रेल्वे प्रवासासाठी पास मिळणार आहे.

करोना प्रादुर्भावामुळे दीर्घकाळापासून बंधनांमध्ये अडकलेल्या मुंबई लोकलला आता मोठा दिलासा मिळाला आहे. प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने टप्प्याटप्प्याने लोकल रेल्वे सुरू तर केली होती. मात्र त्यासाठी महिन्याभराचा पास काढणं बंधनकारक करण्यात आलं होतं. एका दिवसाच्या प्रवासासाठीचं तिकीट मिळत नव्हतं. पण आता एका दिवसासाठीचं तिकीटही दिलं जाणार आहे.

आता लसीकरण पूर्ण होऊन १५ दिवस झालेल्या व्यक्तींना लोकलचं तिकीट मिळणार आहे. राज्य सरकारने लोकलची तिकीट विक्री बंद करून सर्वांना फक्त मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते. मात्र त्यामुळे गेले काही दिवस प्रचंड गोंधळ आणि संताप बघायला मिळाला होता. रेल्वेने ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्या नंतर राज्य सरकारने पुन्हा एक पत्र रेल्वेला लिहिले आहे. या पत्रात लसीकरण पूर्ण झालेल्या, अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या, अशा सर्वच प्रवाशांना एक दिवसीय तिकीट देण्यात यावे अशी विनंती केली आहे. यासंदर्भात एबीपी माझाने सविस्तर वृत्त दिलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी येथे क्लिक करा.

त्यासाठी रेल्वेने अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावे, फक्त लसीकरण झालेले प्रवासीच तिकीट आणि पास घेत आहेत याची खात्री करावी, कोविड नियम पाळले जात आहेत याची खात्री करावी अशा सूचना देखील राज्य सरकारने केल्याचे पत्रात आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ दोन लस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली होती. आतापर्यंत ज्या लोकांनी करोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि त्याला १४ दिवस पूर्ण झाले आहेत अशांना रेल्वे प्रवासासाठी पास मिळायचा.
१८ वर्षाच्या आतील मुलांना आणि वैद्यकीय कारणांमुळे लस घेऊ न शकणाऱ्या नागरिकांना १५ ऑक्टोबरपासून रेल्वे प्रवासासाठी पास दिला जाऊ लागला आहे. १८ वर्षाखालील मुलांना प्रवासाच्या वेळी ओळखपत्र सोबत बाळगावे लागणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने या मुलांना लोकल प्रवासासाठी पास देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळं १८ वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवास करता येणार आहे. तसेच काही महत्वाच्या वैद्यकीय कारणांमुळे ज्या लोकांना लस घेता येत नाही अशांनाही रेल्वे प्रवासासाठी पास मिळणार आहे. अशा लोकांनी पास काढतेवेळी डॉक्टरांचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai local those who have completed 15 days of vaccination will get a local ticket vsk

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या