scorecardresearch

Premium

मुंबई सेंट्रल जवळ लोकल ट्रेन रुळावरुन घसरली, पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहे.

local train derailed in mumbai, western railway services disrupted
मुंबई सेंट्रल जवळ लोकल ट्रेन रुळावरुन घसरली, पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल येथे बुधवारी सकाळी ११.२० च्या सुमारास लोकल रुळावरून घसरली. ही लोकल कारशेडमध्ये जात होती. त्यामुळे लोकलमध्ये प्रवासी नव्हते. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवरील पनवेल-कळंबोली येथे नुकतीच मालगाडी घसरल्याची घटना घडली होती.

हेही वाचा : मुंबईत पदपथावरील मार्ग प्रतिबंधक अपंगांसाठी ठरत आहेत अडथळा, उच्च न्यायालयाकडून दखल

railway to operate mega block tomorrow on all three railway lines
पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, ‘हे’ आहे कारण…
Thane Railway Station Rush platform no 7 bridge dangerous Viral Video
बापरे! ठाणे रेल्वे स्थानकात भयंकर गर्दीचा VIDEO होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ
dombivli railway station, people walking on the railway track
डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे मार्गातून प्रवाशांची ये-जा
mega block on western and central line
Mumbai Local Megablock : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये रिकामी लोकल जात असताना तिचे एक चाक रेल्वे रुळावरून घसरले. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहे. तसेच सर्व डाऊन धीम्या लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai local train derailed western railway services disrupted mumbai print news css

First published on: 04-10-2023 at 12:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×