मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धीम्यामार्गावर, हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेद्वारे हार्बर मार्गावरील गोरेगाव ते वांद्रे अप- डाऊन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ दरम्यान

परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या लोकल माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील आणि नंतर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीवदरम्यान मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

———————–

हार्बर रेल्वे

कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर

कधी : सकाळी ११. १० ते दुपारी ४.४० दरम्यान

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी / वडाळा येथून वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा आणि वांद्रे / गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द राहणार आहे. तर, पनवेल / बेलापूर / वाशी येथून सीएसएमटीकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव / वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्लादरम्यान विशेष लोकल सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालविण्यात येतील.

————————-

पश्चिम रेल्वे

कुठे : गोरेगाव – वांद्रे अप- डाऊन हार्बर मार्गावर

कधी : सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० दरम्यान

परिणाम : ब्लॉक कालावधीत मध्य रेल्वेच्या सीएसएमटी – वांद्रे – सीएसएमटी आणि सीएसएमटी / पनवेल – गोरेगाव सीएसएमटी / पनवेल हार्बर मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट – गोरेगाव – चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या काही धीम्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.