मुंबई : विविध अभियांत्रिकी कामे, रेल्वे रुळ, ओव्हर हेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
मुख्य मार्ग
कुठे : सीएसएमटी – विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
परिणाम : सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी – विद्याविहार या स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील . या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील.
हार्बर मार्ग
कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० पर्यंत
परिणाम : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे – सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लाॅक असेल. या कालावधीत लोकल सेवा रद्द असतील. सीएसएमटी येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन लोकल आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते संध्याकाळी ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगावला जाणाऱ्या डाऊन लोकल सेवा रद्द असतील. पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत सीएसएमटीकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द असतील. गोरेगाव / वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सीएसएमटीकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द असतील. ब्लॉक कालावधीत पनवेल – कुर्लादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवासी ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान प्रवाशांना मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करता येईल.
पश्चिम रेल्वे
कुठे : सांताक्रूझ – गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ – गोरेगाव दरम्यानच्या जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. याव्यतिरिक्त, या ब्लॉकमुळे काही लोकल सेवा रद्द करण्यात येतील, तर, बोरिवली आणि अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल हार्बर मार्गावरून केवळ गोरेगावपर्यंतच चालवण्यात येतील.
