मुंबई : शिथिल के लेले र्निबध आणि वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर करोनापूर्वी कमी के लेल्या लोकल फे ऱ्या आता पूर्ववत करण्याचा निर्णय झाला आहे. या दोन्ही मार्गावरील उर्वरित १३५ फे ऱ्याही २८ ऑक्टोबरपासून सेवेत येतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. त्यामुळे १०० टक्के लोकल फे ऱ्या सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे. करोनापूर्वी मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर दररोज १,७७४ लोकल फे ऱ्या, तर पश्चिम रेल्वेवर १,३६७ फे ऱ्या होत होत्या. करोना आणि त्यानंतरच्या  टाळेबंदीमुळे २२ मार्च २०२० पासून लोकल सेवाही बंद झाली. १५ जून २०२० पासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच लोकल पुन्हा सेवेत आली. त्यानंतर करोनाची स्थिती पाहून प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच दोन लसमात्रा घेतलेले आणि १८ वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवासाची परवानगी दिल्यानंतर लोकल प्रवासी संख्येत वाढ होऊ लागली. परिणामी उपनगरीय गाडय़ांना गर्दी होत असल्याने उर्वरित लोकल फे ऱ्याही २८ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मध्य रेल्वेवर १,७०२ आणि पश्चिम रेल्वेवर १,३०४ फे ऱ्या होतात. मात्र लवकरच करोनापूर्वीच्या दोन्ही मार्गावरील सर्व फे ऱ्या आता सुरू होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या फे ऱ्यांमध्ये मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कल्याण जलद मार्गावरील १५ डबा लोकलचाही समावेश आहे. त्याच्या २२ फे ऱ्या होतील.