scorecardresearch

Mumbai Local Update: डहाणू पनवेल मेमू सेवा आजपासून सुरु; तपासा वेळापत्रक

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन अनेक कालावधीपासून बंद असलेल्या डहाण-पनवेल, वसई-पनवेल मेमू आजपासून सुरु होत आहेत.

mumbai-local
डहाण-पनवेल, वसई-पनवेल मेमू आजपासून सुरु (फोटो: Indian Express File Photo)

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना त्यांची डहाणू मेमू ट्रेन पुन्हा एकदा भेटीला आली आहे. प्रवाशांनी महाव्यवस्थापक आलोक कंसल यांचे आभार मानले आहेत. प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी सांगितले की, त्यांच्या भेटीनंतर चार तासांच्या आत ही ट्रेन पूर्ववत करण्यात आली होती, आणि ती पूर्ववत करण्यासाठी त्यांचा महिन्यांचा दीर्घ संघर्ष संपला आहे, ज्यामुळे हजारो प्रवाशांचे जीवन सोपे झाले आहे.

“मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) आणि त्यापुढे राहणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड -१९ महामारीमुळे प्रवास करणे खूप कठीण झाले होते. यापूर्वी पूर्णपणे लसीकरणासाठी लोकल गाड्या उघडण्यात आल्या होत्या, परंतु मेमूच्या गाड्या सुरु झाल्या न्हवत्या ज्या पूर्व पश्चिम आणि लांब पल्ल्याच्या कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वपूर्ण दुवा आहेत. खूप मोठ्या चर्चेनंतर, महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेने गेल्या महिन्याच्या शेवटी मेमू सेवा पुनर्संचयित केली होती, परंतु त्या एमएमआर आणि पनवेल आणि वसई दरम्यान असलेल्या सेवांपर्यंत मर्यादित होत्या. ”डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे (डीव्हीपीएसएस) प्रवक्ते हितेश सावे यांनी मिड-डेला सांगितले .

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन अनेक कालावधीपासून बंद असलेल्या डहाण-पनवेल, वसई-पनवेल मेमू आजपासून सुरु होत आहेत.या गाड्या पुढील सूचना मिळेपर्यंत धावणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. ही गाडी सकाळी ०५.२५ वाजता डहाणू येथून सुटून ०८.५५ वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाला पनवेलहून सायंकाळी ०७.०५ वाजता सुटणारी मेमू रात्री १०.३० वाजता डहाणू येथे पोहोचेल

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai local update dahanu panvel memu to start from monday check time table train between dahanu to panvel ttg

ताज्या बातम्या