मुंबई : पश्चिम उपनगरातील वांद्रे, खार पश्चिम परिसरात शुक्रवार, १६ फेब्रुवारी व शनिवार, १७ जानेवारी रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. मुंबई महानगरपालिका शुक्रवारी १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवर ६०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविणार आहे. या कामामुळे एच पश्चिम प्रभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

हेही वाचा >>> सुधारित माहिती-तंत्रज्ञान कायद्याची १ मार्चपर्यंत अंमलबजावणी नाही, केंद्र सरकारची उच्च न्यायालयात हमी

bus
जिल्हाधिकाऱ्यांनी अडीच हजार वाहने घेतली ताब्यात
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
BEST to install air purifiers, air purifiers in best buses, Mumbai air pollution, BEST Buses Install Mobile Air Purifiers
बेस्ट उपक्रमाच्या १७० बसगाड्यांवर हवशुद्धीकरण यंत्रे कार्यान्वित
try to close the Forest Range Officer Deepali Chavan suicide case
वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण बंद करण्याचा घाट!

एच पश्चिम विभागातील पाली गाव, नवी कांतवाडी, शेरली राजन, च्युईम गाव, पाली पठार झोपडपट्टी, डॉ. आंबेडकर मार्ग लगतच्या झोपडपट्ट्या, गझधर बंध भाग, दांडपाडा, १६ वा रस्ता व २१ वा रस्ता यांच्यातील खार पश्चिमेचा भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. शनिवारी १७ फेब्रुवारीनंतर एच पश्चिम प्रभागाचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल. या कालावधीत वांद्रे, खार परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.