scorecardresearch

Video : दोन तरुणींना बाइकवर बसवून तरुणाची स्टंटबाजी, व्हिडीओ पाहून मुंबई पोलिसांनी…

दोन तरुणींसोबत बाइकवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bike Stunt Mumbai
मुंबईत तरुणाची बाइक स्टंटबाजी

मुंबईत एक तरुण दोन तरुणींसोबत बाइकवर धोकादायक स्टंटबाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या १३ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एक तरुण दोन तरुणींना बाइकवर बसवून स्टंट करताना दिसतोय. तरुणाच्या पुढे एक आणि मागे एक अशा दोन तरुणी बसल्या आहेत आणि तो व्हीली स्टंट करतोय.

या तरुणाने धावत्या बाईकचं पुढचं चाक उचललं आहे आणि एका चाकावर ही बाइक त्याने काही मीटरपर्यंत चालवली. त्याच्यासोबत दोन तरुणीदेखील आहेत. बाइकवर बसलेल्या मुली हातवारे करताना दिसत आहेत, हसत आहेत. तसेच बाइकवर बसलेल्या तिघांपैकी कोणीही हेल्मेट घातलेलं नाही. @PotholeWarriors या ट्विटर हँडलवरून या स्टंटबाजीचा व्हिजीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १.७३ लाख लोकांनी पाहिला आहे.

हे ही वाचा >> “गीदड की खाल…”, साईबाबांवरील प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, “त्यांना ईश्वराचं स्थान…”

पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी ट्वीट केलं आहे. पोलिसांनी लिहिलं आहे की, वांद्रे-कुल्रा संकुल पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणाला या व्हिडीओमधील व्यक्तींची माहिती असेल, तर तुम्ही आम्हाला थेट मेसेज करू शकता. पोलिसांनी याप्रकरणी कलम २७९ आणि कलम ३३६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 10:01 IST

संबंधित बातम्या