मुंबईत एका ३७ वर्षीय व्यक्तीला एका वर्षाच्या तुरुंगवासाची आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयान सुनावली आहे. ही व्यक्ती बळजबरीने महिलाच्या गालाचं चुंबन घेतल्याबद्दल दोषी असल्याप्रकरणी न्यायालयाने निकाल दिला आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण सात वर्षांपूर्वीच असून काही दिवसांपूर्वीच त्याचा निकाल लागलाय.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीने घडलेला प्रकार मुद्दाम केला नसल्याचा युक्तीवाद केला. माझ्या मागे उभ्या असणाऱ्या एका प्रवाशाने धक्का दिल्याने आपले ओढ या महिलेच्या गालाला चिकटले आणि हा प्रकार घडल्याचा दावा आरोपींनी न्यायालयासमोर केला. मात्र महानगर दंडाधिकारी व्ही. पी. केदार यांनी हा युक्तीवाद फेटाळून लावल्याचं बार अॅण्ड बेंचने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
Body of 12 year old boy who went missing from Thakurwadi in Daighar found in Panvel
डायघर येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह पनवेलमध्ये
mumbai, malad, Malvani, Three Youths, Fall into Drain, Two Declared Dead, Tragic Incident,
मुंबई : मालाड येथील मालवणीमध्ये तिघे गटारात कोसळले; दोघांचा मृत्यू

पुरुषाच्या नजरेवरुन आणि स्पर्शावरून त्याचा हेतू काय आहे हे ओळखण्याची क्षमता महिलेकडे असते, असं न्यायालयाने निकाल देताना म्हटलंय.
“असं म्हटलं जातं की महिलांची आकलनशक्ती ही पुरुषांपेक्षा अधिक असते. यालाच सामन्यपणे महिलांचे अंतर्ज्ञान असं म्हटलं जातं. न बोलता केलेले इशारे आणि खाणाखुणा महिलांना लगेच समजतात. जेव्हा पुरुष महिलेकडे बघतो किंवा तिला स्पर्श करतो त्यावरुनच तिला त्याचा हेतू समजतो,” असं न्यायालयाने निकाल देताना म्हटलंय.

नक्की वाचा >> “अशा लोकांमुळे मुंबईत AC लोकल फेल ठरली”; बनियान, टॉवेलवर लोकल ट्रेनमधून प्रवास करणारा मुंबईकर पाहिलात का?

“याबाबतीत त्याची साक्ष ही कायमच निर्विवाद आणि भक्कम असते. ही घटना अनवधानाने घडली आहे असे म्हणणे आणि त्यासाठी काही ठोस स्पष्टीकरण अथवा तसा दावा सिद्ध करणाऱ्या कोणत्याही गोष्ट उपलब्ध नसण्याने आरोपीचा बचाव करता येणार नाही,” असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३५४ (स्त्रीची विनयशीलता धोक्यात येईल अशी अपमानजनक वागणूक) न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. किरण सुब्राय होनावर असं आरोपीचं नाव आहे.

यापूर्वी पीडितेने न्यायालयात दिलेल्या साक्षीमध्ये, २८ ऑगस्ट २०१५ रोजी ती एका मित्राला भेटण्यासाठी गोवंडीला गेली होती तेव्हा दुपारी एक वाजून २० मिनिटांच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं म्हटलंय. पीडिता तिच्या मैत्रासोबत गोवंडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) लोकल ट्रेनमध्ये चढली. आरोपी मस्जिद बंदर स्टेशनवर ट्रेनमध्ये चढले आणि या दोघांजवळ बसले. “आरोपी माझ्याकडे टक लावून पाहत आहे याची मला जाणीव होती, परंतु मी त्याच्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले,” असंही पीडितेने सांगितलं.

त्यानंतर, पीडित मुलगी आणि तिचा मित्र ट्रेन सीएसएमटीजवळ आल्यावर खाली उतरण्यासाठी दारात उभे राहिले. त्यावेळी आरोपीही या मुलीच्या बाजूला येऊन उभा राहिला. त्यानंतर खाली उतरताना आरोपीने पीडितेच्या उजव्या गालाचे अनपेक्षितपणे चुंबन घेतले. हा प्रकार घडताच पीडितेने आरडाओरड केला. त्यानंतर तेथे प्रवाशांनी या तरुणाला मारहाण केली. नंतर सीएसएमटी रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.