मुंबई : वांद्रे – वरळी सागरी सेतूवर मोटरगाडीने आलेल्या व्यक्तीने समुद्रात उडी मारली. सदर व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. अल्ताफ मोहम्मद हुसेन असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून ते गोवंडी येथे वास्तव्यास होते.
गुरुवारी रात्री १ च्या सुमारास अल्ताफ मोटगाडीतून वांद्रे – वरळी सागरी सेतूवर आले. तेथे एका बाजूला मोटरगाडी उभी करून त्यांनी समुद्रात उडी मारली. पोलीस नियंत्रण कक्षाने याबाबतची माहिती वरळी पोलिसांना दिली. त्यानुसार वरळी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वरळी अग्निशमन दल व वांद्रे अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने समुद्रात शोध घेतला. परंतु काळोख व भरतीमुळे त्यांचा शोध लागला नाही. दरम्यान, अल्ताफ यांचा मृतदेह शुक्रवारी दादर समुद्रकिनाऱ्यावर सापडला. पोलिसांनी मृतदेह नायर रुग्णालयात पाठवला असून कुटुंबियांना याबाबतची माहिती देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली.
हेही वाचा – मुंबई : विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शाळेच्या बसमधील सहाय्यकाला अटक
सागरी सेतूवरील खांब क्रमांक ८३ व ८४ च्या दरम्यान मोटरगाडी थांबवून हुसेन यांनी समुद्रात उडी मारली. या घटनेमुळे कुटुंबीय तणावाखाली आहेत. त्यांच्याकडून हुसेनबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.