मुंबई : येत्या बुधवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. या नाकाबंदीदरम्यान मानखुर्द पोलिसांनी शनिवारी वाशी चेकनाका परिसरात चेन्नईहून येणारा एक ट्रक अडवला. या ट्रकच्या तपासणीत आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी सापडली असून त्याची तिची किंमत ८० कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. ट्रकच्या तपासणीत आढळून आलेली चांदी ही हाँगकाँग येथून चेन्नई येथील कंपनीच्या कार्यालयात आणण्यात आली होती. तेथून ती मुंबईत आणण्यात येत होती. घटना उघडकीस आल्यानंतर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी तसेच अणुशक्ती नगर मतदार संघ १७२ येथील भरारी पथकाला पाचारण करण्यात आले असून ते याप्रकरणी तपास करत आहेत.

हेही वाचा : आमच्या भविष्यासाठी अमितकाका तुम्हाला आमदार व्हावेच लागेल, मनसे पदाधिकाऱ्याच्या कन्येचे प्रचारादरम्यान अमित ठाकरेंना पत्र

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याकरिता त्यांना पैसा, भेटवस्तूंचे वाटप करण्यात येते. त्यामुळे, रोकड, दारू, भेटवस्तू आदींची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. हा प्रकार रोखण्याकरिता वाहनांची तपासणी केली जात आहे. मानखुर्द पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधु घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी चेकनाका येथे नाकाबंदी लावण्यात आली. या नाकाबंदीदरम्यान चेन्नईहून मुंबईला येणारा ट्रक पोलिसांनी शनिवारी पहाटे पोलिसांनी अडवला आणि त्याची तपासणी केली. त्यावेळी, ट्रकमध्ये साडेआठ टन वजनाची चांदी आढळून आली. इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रकमध्ये चांदी आढळून आल्याने त्याची माहिती तात्काळ प्राप्तीकर विभाग व निवडणुक आयोगाच्या पथकांना देण्यात आली. तसेच, पंचनामा केल्यानंतर पुढील कारवाई करिता जप्त केलेली चांदी प्राप्तीकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली. या चांदीबाबत आवश्यक ती शहानिशा प्राप्तिकर विभाग व निवडणूक आयोगामार्फत केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Story img Loader