‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या निवडणुकीला आव्हान

आक्षेप घेतला गेल्यानंतर केवळ पहिल्या पानावर निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली

६० जणांचे बोगस मतदान झाल्याचा आरोप

मुंबई : अधिकृत प्रक्रियेचा अवलंब न होणे आणि ६० जणांचे बोगस मतदान झाल्याचा आरोप करत ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या निवडणुकीतील ‘वाचक’ पॅनेलने निवडणूक प्रक्रियेला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी याबाबतचे आक्षेप पॅनेलतर्फे  निवडणूक अधिकारी, प्रमुख कार्यवाह आणि धर्मादाय आयुक्तांकडे नोंदवण्यात येणार आहेत.

प्रतिष्ठित असलेल्या मात्र गेल्या काही वर्षांत अनेक वादांनी ग्रासलेल्या ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या २९ शाखांची निवडणूक रविवारी पार पडली. नायगाव शाखेत ‘वाचक’ पॅनेलचे सात आणि ‘प्रगती’  पॅनेलचे सात उमेदवार उभे होते. तसेच दोन उमेदवार स्वतंत्रपणे उभे होते. एकू ण ७१० मतदारांपैकी केवळ १७० मतदारांनी निवडणुकीत मतदान के ले. यात प्रगती पॅनेलच्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळाली; मात्र या निवडणुकीत अधिकृत प्रक्रियेचा अवलंब करण्यात आलेला नसून ६० जणांचे बोगस मतदान झाल्याचा आरोप होत आहे.

वाचक पॅनेलच्या उमेदवार सुचिता मोरे यांच्या म्हणण्यानुसार,  मतदारांच्या यादीवर निवडणूक अधिकाऱ्यांची सही असणे अपेक्षित असताना तेथे अध्यक्षांची स्वाक्षरी होती. आक्षेप घेतला गेल्यानंतर केवळ पहिल्या पानावर निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली. वगळण्यात आलेल्या २२ जणांची नावेही यादीत जोडली गेली’.

‘निवडणुकीची सूचना केवळ शाखेच्या काचपेटीत लावण्यात आली; मात्र प्रत्येक सभासदाला दूरध्वनीद्वारे निवडणुकीची सूचना देणे आवश्यक होते. तसे न झाल्याने अनेक मतदार मतदानासाठी आलेच नाहीत’, असेही सुचिता यांनी सांगितले. त्यामुळे मंगळवारी या निवडणुकीला आव्हान दिले जाणार आहे.

डिसेंबर २०२० मध्ये शाखा समितीची बैठक झाली होती. यावेळी ६० सभासद एकगठ्ठा आढळून आले होते. त्यापैकी २२ जण कधीच ग्रंथालयात आले नसल्याने त्यांची नावे वगळण्यात आली. ज्यांनी ही नावे वगळली त्यांना पदावरून हटवण्यात आले. उर्वरित ३८ सभासदांनीही जानेवारी ते सप्टेंबर २०२१ या कालावधीतील वर्गणी भरलेली नाही.     – सुचिता मोरे,  वाचक पॅनेलच्या उमेदवार

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai marathi granth sangrahalay election challenge in court zws

ताज्या बातम्या